शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue समाचार

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
Big UpdateShivaji Maharaj Statue Collapse IncidentPetition Filed In Bombay High Court
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 85 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हा नोंदवा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज ांचा 35 फुटी पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळलाय. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर, राज्याचे राजकारण देखील चांगलेच तापले आहे. शिवाजी महाराज ांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा 26 ऑगस्टला अचानक कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल नोंदवण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांसह असंख्य नेत्यांच्या उपस्थितीत डिसेंबर 2023 मध्ये उभारण्यात आलेला हा पुतळा अवघ्या 9 महिन्यांतच म्हणजे 26 ऑगस्टला कोसळला त्यामुळे त्याला राज्य सरकार पूर्णतः जबाबदार आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. केतन तिरोडकर यांनी ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. हा पुतळा घाईघाईत उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

'बेजबाबदार बांधकाम व्यावसायिक ज्याप्रमाणे अनधिकृत इमारती किंवा चाळी बांधतो' तसे पुतळा उभारणाऱ्या आपल्या अभियंत्यांमागे राज्य सरकार 'ढाल' बनून उभे राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे. जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत पुतळा बनवण्यात आला. मालवण येथील प्रति तास 45 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा विचार न करता हे काम करण्यात आल्याचा आरोप तिरोडकर यांनी याचिकेत केला आहे.

मालवण येथील स्थानिक नागरिकांनी पुतळा उभारणीत वापरण्यात आलेले नट व बोल्ट गंजल्याच्या परिस्थितीबाबत ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली होती, मात्र त्यांनी त्यावर कोणतीही उपाययोजना न करता केवळ ही माहिती मेल द्वारे डिझाईनर व स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांना पाठवली व आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचा समज त्यांनी करुन घेतला, याकडे तिरोडकर यांनी याचिकेद्वारे लक्ष वेधले आहे. या जनहित याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Big Update Shivaji Maharaj Statue Collapse Incident Petition Filed In Bombay High Court Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue शिवाजी महाराज राजकोट किल्ला मालवण किल्ला

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुन्हेगार फरार; पोलिसांच्या कारभारावर शिवप्रेमी संतापलेछत्रपती शिवाजी महाराजांचे गुन्हेगार फरार; पोलिसांच्या कारभारावर शिवप्रेमी संतापलेसिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाल्यानं शिवप्रेमी संतप्त झालेत.
और पढो »

शिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवार गट नाराज? रस्त्यावर उतरणारशिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवार गट नाराज? रस्त्यावर उतरणारChhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
और पढो »

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तुम्ही माफी मागणार का? CM शिंदे म्हणाले 'मी एकदा...'Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे.
और पढो »

Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'Rane-Thackeray Clash: राणे समर्थकांकडून तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? आदित्य ठाकरे म्हणाले 'माझ्या खिशात...'Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं असतानाच ठाकरे-राणे समर्थक भिडले आहेत.
और पढो »

'CM म्हणतात, वाऱ्याने पुतळा पडला; शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग 375 वर्षे हाच वारा सहन करत उभा''CM म्हणतात, वाऱ्याने पुतळा पडला; शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग 375 वर्षे हाच वारा सहन करत उभा'CM Shinde On Shivaji Maharaj Statue Collapses: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन साधला निशाणा
और पढो »

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे... शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेतमध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे... शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेतकिल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय... त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:27:29