Akola Crime News : अकोला येथे सहा पुरुषांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले होते. यांनी हे पैसे सरकारला परत केले आहेत.
हा नेमका काय घोळ म्हणायचा? दोन पुरुषांनी सरकारला परत केले खात्यात जमा झालेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे
सरकारची लाडकी बहिण योजना चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्रात लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पहिल्यांदाच अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात एकूण तीन महिन्यांचे मानधन म्हणून 4500 रुपये जमा झाले आहेत. तर अनेक महिलांना तिसरे मानधन देखील मिळाले आहे. लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेतल्याचे तसेच सरकारची फसवणूक झाल्याचे प्रकार देखील समोर येत आहेत. अशातच दोन पुरुषांनी बँक खात्यात जमा झालेले लाडक्या बहिण योजनेचे पैसे सरकारला परत केले आहेत. अकोल्यात हा प्रकार घडला आहे.
राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता अकोल्यात 6 पुरुषांनी अर्ज भरले होते. यापैकी 5 पुरुष हे अकोला महानगरपालिका हद्दीतील रहिवासी आहेत. तर. एक हा अकोट तालुक्यातील आहे. या पुरुषांनी स्वतःचे आधार कार्ड नारीशक्ती दूत ॲपवर अपलोड करून संपूर्ण माहिती खोट्या स्वरूपाची भरल्याचे दिसून आले होते.
हे देखील वाचा... मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात... विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका यांच्या तपासणी दरम्यान सदरचा हा प्रकार उघडकीस आला होता. या सहा पुरुषांना खुलासा मागण्यात आला होता. प्रकरण अंगलट येण्याची शक्यता पाहता या सहा पुरुषांपैकी दोन पुरुषांनी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये धनादेश द्वारे राज्यसरकारला परत केले आहेत. तर चार पुरुषांनी आपण '''' लाडका भाऊ '''' योजना समजून अर्ज भरला असल्याचा खुलासा दिला आहे. तर, उर्वरित दोन पुरुषांनी अद्यापही खुलासा दिलेला नाही.
Akola Crime Akola Crime News Akola News माझी लाडकी बहिण योजना अकोला लाडकी बहिण योजना
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
चाललंय तरी काय? 'वर्षा'मधून अजित पवारांचा फोटो 'गायब'; श्रीकांत शिंदेंची एन्ट्रीGovernment Scheme Display: मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानावरील प्रदर्शनामध्ये अजित पवारांचे फोटो दिसत नव्हते. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...
और पढो »
पेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?EPS Pensioners: तुम्हीही पेन्शनधारकांमध्ये मोडता? जाणून घ्या काय आहे हा नवा बदल आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया...
और पढो »
कित्येकांचे Salary Account असणाऱ्या दोन बड्या बँकांना RBI कडून कठोर शिक्षा; खातेधारकांचं काय?RBI Impose Penalty On Two Banks : या बँकांमध्ये अनेकांचीच खाती आहेत. तुम्हीही आहात खातेधारकांच्या या यादीत? पाहा महत्त्वाची बातमी
और पढो »
राजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डावMaharashtra Politics : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र,फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. .
और पढो »
महिलांनो लक्ष द्या! लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणारMajhi Ladki Bahin Yojana 3rd Installment: लाडकी बहीण योजनचा तिसरा हफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार, आदिती तटकरे यांनी दिली माहिती.
और पढो »
'लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेल्या आमच्या सख्ख्या बहिणी, बाकीच्या...' भाजप आमदारांच अजब विधानLadki Bahin Yojana : महायुती सरकारचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा केल्या जात आहेत. असं असताना भाजपाच्या एका आमदाराने या योजनेबाबत अजब विधान केलं आहे.
और पढो »