उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
सामनामधील अग्रलेखातून नारायण राणे आणि कुटुंबावर जहरी टीका करण्यात आली आहे."भाजपचा आकडा महाराष्ट्रात नऊवर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले. त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे हे आहेत. राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते," असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे. दरम्यान या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना हिंमत असेल तर वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी असं जाहीर आव्हानही दिलं आहे.
सामना अग्रलेखावलर बोलताना ते म्हणाले की,"लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितल त्यामुळे संजय राऊत व विनायक राऊत यांना मिरच्या झोंबल्या आहेत. कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो असं राऊत आणि ठाकरेंना वाटतं का? आमचा कोकणी माणूस कधीही कोणाजवळ कर्ज मागत नाही. घेतलेले कर्ज त्वरित फेडतो . आमच्या कोकणातील जनतेचा अपमान कोण करत असेल तर आमची जनता त्यांना गाडून टाकेल, उद्धव ठाकरेला कोकणातील जनता समजली नाही".
"उद्धव ठाकरेच्या विकास विरुद्ध प्रवृत्तीला जनतेने नाकारलं आहे. सामान्य मतदारांचा अपमान करण्याचं काम उद्धव ठाकरेंचे कारटे करत आहेत. उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही," असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. रवींद्र वायकर यांच्या विषयावर तीळपापड होत आहे नेहमी कॉपी करुन पास होणाऱ्या उद्धव ठाकरेंना पारदर्शक निकाल समजला नाही.
आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान देताना ते म्हणाले की,"भाजपाच्या कार्यालयात आम्हाला म्याव म्यावचा आवाज येत नाही. एलॉन मस्कचा आधार घेण्यापेक्षा वरळी कडे लक्ष द्या. तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर वरळीतून उभा राहून दाखव. तुमच्या मानेवर बसून काँग्रेस 13 वर गेली आहे". हे ईव्हीएमच्या नावाने शेंबड्यासारखं रडणं ही त्यांची सवय झाली आहे अशी टीकाही त्यांनी आव्हाडांवर केली.
बॅनर युद्धावर ते म्हणाले की,"प्रत्येक पक्षात अतिउत्साही कार्यकर्ते बॅनर लावतात. त्याची दीपक केसरकर यांनी दाखल घेतली आहे. शिंदे साहेबांच्या शिवसेनेत काही उबाठाप्रेमी घुसलेले आहेत. त्यांना दूर करावं अशी मागणी आम्ही केली आहे". रोहित पवार स्वतः मंत्रिपदसाठी अजित पवारांच्या संपर्कात आहेत. ते अजित पवारांच्या बाजुला असतील असा दावाही त्यांनी केला.महाराष्ट्र
Nitesh Rane Shivsena Assembly Election
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्जKonkan Railway Bharti:चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
और पढो »
Uric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थHealth Tips: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
और पढो »
रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा.
और पढो »
वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..., सुरेश रैनाने दिला या दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्लाT20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.
और पढो »
शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराRohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
और पढो »
'पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा वकिल पवार कुटुंबियांच्या जवळचा' नितेश राणेंचा गौप्यस्फोट, तर सुप्रिया सुळे म्हणतात...Pune Accident News : पुणे अपघात प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. अपघातातील पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही मुलाला चालवण्यासाठी देण्यात आली होती. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
और पढो »