विशेष अधिवेशनादरम्यान अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुगलबंदी रंगली. संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. सभागृहात अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये रंगलेली जुगलबंदी कशी होती, पाहुयात.
विधानसभेच्या अधिवेशनात गंभीर मुद्यांवर जशी चर्चा होत असते. तसेच काही हलकेफुलके क्षणही पाहायला मिळत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये सभागृहातच जुगलबंदी रंगली. आपल्या खुमासदार शैलीतल्या भाषणासाठी जयंत पाटील ओळखले जातात. तर बेधडक वक्तव्यांसाठी अजितदादा प्रसिद्ध आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर अनेकांची भाषणं झाली. अजितदादांच्या भाषणानंतर जयंत पाटील भाषणाला उभे राहिले. आणि सुरू झाली दादा आणि पाटलांमधली जुगलबंदी.
जयंत पाटील भाषणात एक जुना किस्सा सांगत होते. बोलताना जयंत पाटलांनी स्वत:चा उल्लेख आमदाराऐवजी अध्यक्ष असा केला. नेमकं इथंच अजितदादांनी पाटलांना कात्रीत पकडलं आणि त्यांची चूक दुरूस्त करून दिली. पण यानंतर शांत बसतील ते जयंत पाटील कसले. त्यांनी लगेच, अजितदादांचं आपल्यावर किती बारीक लक्ष आहे बघा, असा टोला लगावला.आता जयंत पाटलांनी बॅटींग केल्यानंतर अजितदादांनी पुन्हा टोला लगावला. माझं लक्ष आहेच पण तुम्हीच प्रतिसाद देत नाही, असं म्हणत दादांनी पुन्हा पाटलांच्या कोर्टात चेंडू टोलवला.
अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये रंगलेली जुगलबंदी संपूर्ण सभागृह बघत होतं. सर्व उपस्थित आमदारांनी या जुगलबंदीचा आस्वाद घेतला. कायम राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या वातावरणात हे हलकेफुलके क्षण अनेकांना हसवून गेले.मनोरंजन
Ajit Pawar Jayant Patil Maharashtra Assembly Session
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या गणितांनी सर्वांच लक्ष वेधलं.
और पढो »
पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना झापलं! म्हणाले, 'माझा पक्ष, माझे वडील अजित पवार कोणत्याही...'Ajit Pawar NCP Design Boxed Naresh Arora Controversy: अजित पवारांच्या पक्षासंदर्भातील डिझाइन्ड बॉक्स आणि नरेश अरोरा वादामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेAjit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
और पढो »
...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठलेMahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.
और पढो »
फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
और पढो »
'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलंAjit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे...
और पढो »