ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांनी भूमिका चित्रपटात एकत्र काम केलं होतं. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अमोल पालेकर यांनी स्मिता पाटील यांच्या कानाखाली लगावली होती. अनपेक्षितपणे कानाखाली बसल्यानंतर स्मिता पाटील आश्चर्यचकित झाल्या होत्या.
"भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान श्याम बेनेगल यांनी मला स्मिता पाटीलला कानाखाली मारण्यास सांगितलं होतं. ते म्हणाले आपण तिला सांगायचं नाही. त्यावर मी त्यांना मी असं करणार नाही सांगितलं. तालीम केली नसलेली कोणतीही गोष्ट करण्यास मी नकार देतो. तुमच्या सह अभिनेत्याला तुम्ही काय करणार आहात हे माहिती असावं. त्याच्यापासून लपून, त्याच्या वर येण्यासाठी अशी कोणतीही गोष्ट करणं माझ्या मते चुकीची आहे.
पुढे ते म्हणाले,"श्याम बेनेगल नाराज झाले होते. त्यांनी मला ही ऑर्डर आहे असं सांगितलं. त्यांनी शुटिंगला सुरुवात केली. मला काय करावं हे कळत नव्हतं. शॉट सुरु झाल्यानंतर स्मिताने अभिनय सुरु केला आणि एका ठिकाणी मी तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने कानाखाली लावली. स्मिताचे पूर्ण हावभाव यानंतर बदलत गेले. तिच्या चेहऱ्यावर सगळा अविश्वास दिसत होता, की हे या माणसाने काय केलं. अविश्वासानंतर अपमान आणि त्यानंतर येणारा राग तिच्या चेहऱ्यावर दिसत होता".
"यादरम्यान कॅमेरा सुरु होता. तिचे ते सर्व हावभाव कॅमेऱ्यात कैद होत होते. फक्त कॅमेराच नाही तर मीदेखील सर्व विसरुन तिला पाहत होतो. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून थक्क झालो होतो. यानंतर श्याम बेनेगल यांनी कट म्हटल्यानंतर मी स्मिताला मिठी मारली आणि माफी मागितली. आम्ही दोघं फार रडलो," असंही अमोल पालेकर यांनी सांगितलं.
"मी त्यांच्यासमोर काहीच बोलत नव्हतो. माझे डायलॉगही नव्हते. मग हा अभिनेता माझ्यापेक्षा किती छोटा आहे हे दाखवण्याची गरज काय? मला छोटं दाखवून तुमची उंची तर वाढत नाही. ती आपल्या बळावर आहे. हा प्रश्न माझ्या मनात येत राहिला. मी असं कधी होऊ देणार नहाी असं ठरवलं. मी अशी वागणूक कोणालाही देणार नाही. अभिनेत्याला आपला शेवटचा टप्पा सुरु झाला आहे हे समजत आहे. वेळ आपल्या हातातून निघत चालली आहे हे समजतं. त्या असुरक्षित भावनेमुळे हे होत असावं", असं अमोल पालेकर यांनी सांगितलं.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?Maharashtra Assembly Election Result: राज्यात आज विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी 2019मध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
और पढो »
फडणवीस आणि अमृता यांची ती पहिली भेट; 90 मिनिटांत नेमकं काय घडलं?देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस ही जोडी राजकारणातील चर्चेतील जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी काय?
और पढो »
KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
और पढो »
नोकरी हवी असेल तर 20 लाख द्या! अट असतानाही Zomato कडे 10 हजार उमेदवारांचे अर्ज; CEO आश्चर्यचकित, म्हणाले 'सर्व पैसे...'झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी खुलासा केला आहे की, त्यांच्याकडे चिफ ऑफ स्टाफ (Chief of Staff) पोस्टसाठी 10 हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
और पढो »
Anil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर...; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रमTimeline of Attack on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
और पढो »
शपथविधी प्रियंका गांधींचा मात्र चर्चा साडी अन् इंदिरा गांधींची! जाणून घ्या संसदेत आज नेमकं घडलं कायकाँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या आज संसदेत शपथ घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी प्रियंका गांधी अतिशय सुंदर आणि साध्या पारंपारिक साडी नेसून पोहोचल्या होत्या. प्रियंका गांधी यांच्या शपथविधीसोबतच इंदिरा गांधी आणि लूकची जोरदार चर्चा झाली.
और पढो »