भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात असून, Prime Minister s XI संघाविरोधात दोन दिवसांचा सराव सामना खेळत आहे.
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात असून, Prime Minister's XI संघाविरोधात दोन दिवसांचा सराव सामना खेळत आहे.भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनिमित्त ऑस्ट्रेलियात आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला असून, सध्या संघ Prime Minister's XI संघाविरोधात दोन दिवसांचा सराव सामना खेळत आहे. हा सामना खेळताना कर्णधार रोहित शर्मा आणि सरफराज खान यांच्यातील एका क्षणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
ऋषभ पंतच्या जागी सरफराज खान यष्टीरक्षण करत होता. यादरम्यान एका चेंडूवर तो गोंधळलेला दिसला. जॅक क्लेटन बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑलिव्हर डेव्हिसला हर्षित राणाने शॉर्ट पिच चेंडू टाकल्यानंतर डावाच्या 23 व्या षटकात ही घटना घडली. क्लेटनकडून चेंडू सुटल्यानंतर तो सरफराज खानच्या दिशेने गेला. पण यष्टीरक्षण करणारा सरफराज हा चेंडू रोखण्यात अयशस्वी ठरला. सरफराज खाली पडलेला चेंडू उचलण्यासाठी गेला असता रोहितने त्याच्या पाठीवर जोरदार बुक्की मारला. पण ही बुक्की त्याने रागात नाही, तर मस्करीत मारलेली होती. यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहून हसताना दिसले.राणाच्या पुढच्याच चेंडूवर डेव्हिस शून्यावर बाद झाला. तत्पूर्वी, मुसळधार पावसामुळे पहिल्या दिवशी कोणताही खेळ होऊ न शकल्याने दोन दिवसीय सराव सामना 50 षटकांचा खेळण्यात आला.
ESPNcricinfo ने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या आगामी ॲडलेड कसोटीतून बाहेर पडला आहे. शॉन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट, जे अद्याप कसोटीत पदार्पण करू शकले नाहीत त्यांना दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात सामील करण्यात आले. ESPNcricinfo नुसार, स्कॉट बोलँड हा डे-नाईट कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये हेझलवूडच्या जागी असेल. 6 डिसेंबरपासून या कसोटीला सुरुवात होणार आहे.'13 कोटींची पर्स असताना....', CSK विकत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर दीपक चहर स्पष्टच बोलला, 'फक्त धोनीमुळे...'
Australia Rohit Gurunath Sharma Sarfaraz Naushad Khan Harshit Pradeep Rana Oliver Davies Australia Vs India 2024/25 Cricket Zee Sports
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नवऱ्यामुलाकडून हार चोरुन पळून जाणाऱ्याचा पाळलाग; धावत्या मिनी ट्रकवर चढला अन् पुढे..., VIDEO तुफान व्हायरलनवरामुलगा लग्न सोडून मिनी ट्रक ड्रायव्हरचा पाळलाग करत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे.
और पढो »
वाढदिवसाला BF बरोबर कॅफेत गेली, अश्लील Video व्हायरल झाला अन्...; तरुणीबरोबर घडला धक्कादायक प्रकारVideo Shot At Cafe Rape Case: या प्रकरणामध्ये पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेत गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलालाही अटक झाली आहे.
और पढो »
भारतीय बुद्धिबळ स्टार मंचावर जाऊन मॅग्नस कार्लसनच्या पाया पडली; उपस्थितांचा एकच जल्लोष, VIDEO तुफान व्हायरलभारतीय बुद्धिबळ खेळाडू ब्रिस्टी मुखर्जी (Bristy Mukherjee) ट्रॉफी स्विकारण्याआधी जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनच्या (Magnus Carlsen) पाया पडली.
और पढो »
'मी चुकलो...', न्यूझीलंडने 3-0 ने व्हाईट वॉश दिल्यानंतर रोहितने मान्य केली चूक, म्हणाला, 'मनाला इतकं खुपतंय की...'न्यूझीलंडने 3-0 ने कसोटी मालिका जिंकत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभव स्विकारला असून, चुकाही मान्य केल्या आहेत.
और पढो »
बिर्याणी रडत असेल रे! तरुणीने बनवली Parle-G बिर्याणी; खाद्यप्रेमींचा विश्वास बसेना, VIDEO तुफान व्हायरलइंस्टाग्रामवर एका तरुणीचा पार्ले-जी बिर्याणी (Parle G Biryani) बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) नेटकरी संताप व्यक्त करत असून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
और पढो »
भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! संजू सॅमसनचे वडील म्हणाले, 'द्रविड, धोनी, रोहित, विराटने माझ्या...'Sanju Samson Father Video: संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार शतक झळकावल्यानंतर त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना मोठ्या क्रिकेटपटूंची नावं घेतली आहेत.
और पढो »