तब्बल 25 महिलांशी लग्न करणारा लखोबा लोखंडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. नालासोपारा पोलिसांनी कारवाई करत त्यावला जाळ्यात ओढले आहे.
तब्बल 25 महिलांशी लग्न करणारा 'लखोबा लोखंडे' अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. नालासोपारा पोलिसांनी कारवाई करत त्यावला जाळ्यात ओढले आहे.अनेक जणींना फसवून लग्न करणारा आणि पुन्हा तो मी नव्हेच, असे टोपी फिरवत म्हणणारा आचार्य अत्रे यांचा 'लखोबा लोखंडे' अजरामर आहे! तो सध्या मराठी रंगभूमीवर वावरत नसला तरी पालघरच्या नालासोपारात तो अवतरला. या नव्या 'लखोबा'ने एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 वेळा लग्न केले आणि या सर्व पत्नींना अक्षरशः लाखो रुपयांना गंडवले.
फिरोज नियाज शेख याने 2015 मध्ये पुण्यातील चार महिलांना हेरून असेच लग्न केले. त्यानंतर तो 2023 मध्ये 6 वेळा तुरुंगात जाऊन आला. मात्र त्यानंतरही त्याने फसवणूक सुरू ठेवत तब्बल २५ महिलांशी लग्न केले व त्यांच्या भावी साथीदाराबद्दलचे स्वप्न धुळीस मिळवले. लागताच बेड्या ठोकून पोलिसांनी त्याची वरातच काढली. फिरोज नियाज शेखने एका लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून एका महिलेशी ओळख वाढवली. तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिच्याकडून लॅपटॉप व कार घेण्यासाठी 6 लाख 50 हजार 790 रुपये घेऊन तो मग पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने नालासोपारा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला. मात्र त्याचा नंबर नसल्याने पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांनी एक फेक महिलेची प्रोफाईल बनवून महिलेला भेटायला भेटायला बोलावले.
हा तर 'लखोबा लोखंडे'च फिरोजने अशाप्रकारे 25 घटस्फोटित आणि विधवा महिलांची फसवणूक करत लग्न केल्याची धक्कादायक माहिती मग तपासात समोर आली. मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून तो घटस्फोटित आणि विधवा महिलांना हेरत असे. त्यांच्याशी ओळख वाढवून लग्नाचा प्रस्ताव द्यायचा. जमले तर लग्न करून मोकळा व्हायचा. त्या महिलेचे सर्व सोने-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार व्हायचा. हीच त्याची गुन्हा करण्याची पद्धत होती. त्याच्याविरोधात आतापर्यंत फसगत झालेल्या महिलांपैकी कुणीही पोलिसांत तक्रार दिली नव्हती.
विशेष म्हणजे त्याने कोणत्या गुन्ह्यात कोणती कलमे लावतात याची माहिती त्याने घेतली होती. आपली तक्रार होऊ नये याची तो काळजी घेत होता. त्याच्या नावावर एकही मोबाईल नव्हता त्याने फजगत केलेल्या महिलांचे फोन घेऊन इतर महिलांशी बोलत होता. त्याच नंबर वरून तो प्रोफाइल सुद्धा क्रिएट करत होता. याच्यासोबत एक महिला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.Full Scorecard →
Vasai Crime News Man Married With 25 Women वसई क्राईम
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वर्धा हादरलं! घरात घुसून तरुणीवर कात्रीने वार; एकतर्फी प्रेमातून घडला प्रकारYoung Girl Attacked By Lover: पोलिसांनी या प्रकरणामध्ये घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शींबरोबरच परिस्थितीजन्य पुरावेही पोलिसांनी गोळा केले आहेत.
और पढो »
VIDEO : 'काही चुकलं असेल तर माफ करा...', नीता अंबानी यांनी हात जोडून कोणाची माफी मागितली?12 जुलै पासून सुरु झालेला हा लग्न सोहळा पार पडल्यानंतर आता सगळीकडे याच लग्न सोहळ्याची चर्चा सुरु आहे. खरंतर आता या लग्नाची चर्चा सुरु झाली नाही तर गेल्या सहा महिन्यांपासून या लग्नाची चर्चा सुरु होती. या लग्न सोहळ्यात फक्त भारतातून नाही तर परदेशातून देखील पाहुण्यांनी हजेरी लावली होती.
और पढो »
...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
और पढो »
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »
पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
और पढो »
विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
और पढो »