पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामध्ये एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेने सहभाग घेतला आहे. सध्या सगळीकडे तिचीच चर्चा आहे.
ऑल्मिपिकमध्ये सहभागी होणं हा सर्वच ऍथलीटचं स्वप्न असतं. यामध्ये विजय मिळालाच तर त्याचा आनंद गगनात मावत नाहीत. ऑल्मिपिकमध्ये जगभरातून अनेक खेळाडू स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रत्येकाची गोष्ट निराळी आहे. असं असताना एका 7 महिन्याच्या गर्भवती ऍथलीटने या ऑल्मिपिकमध्ये सहभाग घेतला होता. जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
इजिप्तची फेंसर नादा हफीजने ऑल्मिपिकमध्ये सहभाग घेतल्यानंतर सांगितलं की, ती 7 महिन्यांची गर्भवती आहे. तरीही तिने यामध्ये सहभाग घेतला होता. एवढंच नव्हे तर वर्ल्ड कप 10 एलिझाबेथ टार्टकोवस्कीच्या विरुद्ध तिने विजय देखील मिळवला. हाफीजने महिलांच्या वैयक्तिक तलवारबाजीमध्ये टार्टाकोव्स्कीविरुद्ध 15-13 अशा फरकाने पहिली चढाओढ जिंकली. मात्र, तिला राऊंड ऑफ 16 मध्ये दक्षिण कोरियाच्या जिओन ह्योंगविरुद्ध पराभव पत्करावा लागला.29 जुलै रोजी हाफिजने तिच्या गरोदरपणाची बातमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली.
हाफिजने पुढे लिहिले की,"गर्भधारणा स्वतःच कठीण असते, परंतु जीवन आणि खेळ यांचा समतोल राखण्यासाठी लढणे खूप कठीण होते. माझे पती इब्राहिम इहाब आणि माझ्या कुटुंबाच्या विश्वासाने मला इथपर्यंत पोहोचता आले हे माझे भाग्य आहे. हे खास ऑलिम्पिक वेगळे होते. तीन वेळा ऑलिम्पियन पण यावेळी तरुण ऑलिम्पियनसोबत.'' हाफिजने पॅरिस मोहिमेपूर्वी २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक आणि २०२१ टोकियो ऑलिम्पिकमध्ये इजिप्तचे प्रतिनिधित्व केले होते.
Nada Hafez Pregnancy Pregnancy News Paris Olympics 2024 Paris Olympics Olympics 2024 इजिप्ट नादा हफीज गर्भवती Egyptian Fencer Pregnant Paris Olympics Saber Competition
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'प्रेग्नंट दीपिकाला केस धरुन ओढलं तेव्हा रणवीर...', अभिनेत्याचा खुलासाचित्रपटात खूप कमालीची स्टारकास्ट आहे. तर या चित्रपटात कमांडर मानसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शाश्वत चटर्जीच्या कामाची सगळीकडे स्तुती होत आहे.
और पढो »
ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
और पढो »
सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
और पढो »
ISS वर अनर्थ टळला: रशियन सॅटेलाईटचा स्फोट होताच चीनने अवघ्या 6 तासांत बनवला कवच!अंतराळात रशियन सॅटेलाईटचा स्फोट होताच चीनने आपल्या स्पेस स्टेशन भोवती सुरक्षा कवच बांधले आहे. अवघ्या सहा तासात हे सुरक्षा कवच बांधले आहे.
और पढो »
चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
और पढो »
कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला, पण मुंबईकरांना 'या' वेळेतच करता येणार प्रवासMumbai Coastal Road: कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला होत आहे. कुठून ते कुठपर्यंत हा मार्ग असणार आहे, हे जाणून घेऊया.
और पढो »