CIDCO Homes : हक्काचं घर घ्यायचा विषय जेव्हाजेव्हा येतो, तेव्हातेव्हा मध्यमवर्गीयांचं लक्ष सिडको आणि म्हाडाच्या गृहयोजनांकडे लागल्याचं पाहायला मिळतं.
नवी मुंबई आणि नजीकच्या परिसरांमध्ये उत्तमोत्तम सुविधा आणि दर्जेदार बांधकाम असणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये खिशाला परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून देण्यात सिडको चा मोलाचा वाटा आहे. सामान्यांना मोठी आणि किफायतशीर दरातील घरं देण्यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या याच सिडको च्या जवळपास 26000 घरांच्या विक्रीसाठीची सोडत जाहिरात नुकतीच जारी करण्यात आली.
12 ऑक्टोबरपासून सोडतीसाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं सुरुही झाली. पण, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सध्या अर्ज भरण्यासाठीचा इच्छुक वर्ग मात्र चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सिडकोच्या वतीनं योजना पुस्तिकेत घरांच्या किमतींसंदर्भात माहिती दिली नसल्यामुळं अर्जदार पेचात पडले आहेत. समोर आलेल्या कारणानुसार काही तांत्रिक अडचणींमुळं घरांच्या किमतींसंदर्भातील माहिती जाहिर करण्याचं राहून देलं. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये या प्रकल्पनिहाय किमती जारी केल्या जाणार असल्याची माहिती सिडकोच्या वतीनं माध्यमांना देण्यात आली. दरम्यान, सिडकोच्या वतीनं सध्या नवी मुंबईतील विविध ठिकाणी असणाऱ्या जवळपास 27 भागांमध्ये 67 हजार घरं उभारली जात आहेत. दरम्यान यापैकी काही घरांची घोषणा नुकतीच झाली असून, त्यासाठी आतापर्यंत 12 हजार 400 अर्ज ऑनलाईन पद्धतीनं आले आहेत.
सिडको सोडतीत शेवटच्या टप्प्यात वाशी, खारघर रेल्वे स्थानक परिसरातील घरांचाही समावेश करण्यात आला आहे. असं असलं तरीही अद्यापही या एकाही प्रकल्पातील घरांच्या किमतीसुद्धा जाहीर झालेल्या नाहीत, ज्यामुळं आता या किमती केव्हा जाहीर होतात याकडेच इच्छुकांचं लक्ष आहे.
Cidco Lottery 2024 Cidco Homes Cidco Homes 2024 Cidco Homes News Cidco Homes Lottery Cidco House Price Cidco Lottery House Price Cidco News Cidco Website सिडको सिडकोची घरं मराठी बातम्या Real Estate
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
घर से मिटाना चाहते है मच्छरों का नामोनिशान, तो आज ही अपनाएं ये आसान टिप्सघर से मिटाना चाहते है मच्छरों का नामोनिशान, तो आज ही अपनाएं ये आसान टिप्स
और पढो »
गृहमंत्र्यांची चाल हेरत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठा पर्दाफाश; गुजरात, औरंगजेब अन्... तोफ डागत म्हटलं तरी काय?आगामी Vidhansabha Election च्या धर्तीवर सध्या सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, भाजपच्या रणनितीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
और पढो »
IPL 2025 : मेगा ऑक्शनच्या रिटेन्शन नियमांची घोषणा कधी? समोर आले मोठे अपडेट्स, उत्सुकतता शिगेला2024 च्या वर्ष अखेरीस हे ऑक्शन होणार असून त्यासाठी प्रत्येक टीमला त्यांचे ठराविक खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना ऑक्शनसाठी रिलीज करावे लागेल.
और पढो »
रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! Tata Trusts अध्यक्षपदावर नोएल टाटा यांची निवडRatan Tata s successor : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. Tata Trusts च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड झालीय.
और पढो »
Saharsa News: घर में दीप जलाकर चले गए मेला घूमने, लौट कर आए तो माथा पकड़ लिएSaharsa News: बताया जा रहा है कि घर के अंदर दीपक जलाकर पूरा परिवार मेला देखने चला गया था, दीप से ही घर में भीषण आग लग गई.
और पढो »
agra News: 1000दीपों से जगमगाएगा दशरथ महल, राम जन्मोत्सव पर मंगल गीत के साथ मनेगी दीपावलीDashrath Mahal Diwali Mahotsav, Agra: 24 सितंबर को रामलला के जन्म के अगले दिन राजा दशरथ के महल को 1001 दीपों से सजाया जाएगा, साथ ही घर-घर में दीप जलाए जाएंगे.
और पढो »