Dwayne Bravo Retirement : CSK च्या स्टार क्रिकेटरने इन्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय.
वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आणि ऑलराऊंडर ड्वेन ब्रावो याने फ्रँचायझी ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ड्वेन ब्रावो याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. कॅरिबियन प्रिमियर लीग आपली शेवटची व्यावसायिक स्पर्धा असेल, असं देखील ड्वेन ब्रावोने जाहीर केलं. आयपीएल ऑक्शनआधी ड्वेन ब्रावोने निवृत्ती जाहीर केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तुम्हाला माहिती नसेल तर ड्वेन ब्रावो याने 2023 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती.
ब्राव्होने 2021 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजेच युएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ब्राव्होच्या निवृत्तीनंतर वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला होता. त्याची जागा अजूनही भरता आली नाहीये. ड्वेन ब्राव्हो हा कॅरेबियन प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. या लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ब्राव्होनं सीपीएलच्या 103 सामन्यात 128 विकेट घेतल्या आहे. त्यामुळे त्याला आत्तापर्यंत 5 सीपीएल ट्रॉफी जिंकता आल्यात.
टी 20 स्पेशालिस्ट अशी ड्वेन ब्रावोची ओळख आहे. ड्वेन ब्राव्हो हा कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा भाग आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केल्याने त्रिनबागो नाइट रायडर्सला मोठा झटका बसला आहे.आत्तापर्यंत प्रवास खूप सुंदर होताय. पण सीपीएल 2024 हा माझा शेवटचा हंगाम असेल. मला माझी शेवटची व्यावसायिक स्पर्धा त्याच्या कॅरेबियन चाहत्यांसमोर खेळायची आहे.
ड्वेन ब्रावो टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडी मानला जातो. टी 20 मध्ये 500 विकेट घेणारा तो पहिला खेळाडू आहे. आपल्या ऑलराऊड कामगिरीने त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी देखील सर्वोत्तम कामगिरी केली अन् चेन्नईला 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या. ब्राव्होनं टी 20 मध्ये आतापर्यंत 630 विकेट घेतल्या आहेत. तसंच फलंदाजीत 6970 धावाही केल्या आहेत. त्यामुळे डीजे ब्रावोला टी-ट्वेंटी सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Cricket Dwayne Bravo Dwayne Bravo Announces T20 Retirement IPL 2025 Auction
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोण आहे राजेश रवानी? जो ट्रक ड्रायव्हर महिन्याला कमावतो 5 ते 10 लाख रुपये, आनंद महिंद्रांकडून कौतुकTruck Driver Rajesh Rawani Turned YouTuber: सध्या ट्रक ड्रायव्हर राजेश रवानी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. आनंद महिंद्रांनी शेअर केली खास पोस्ट.
और पढो »
हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाHindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
और पढो »
खुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good Newsअभिनेत्री खुशबु तावडे दुसऱ्यांदा आई होणार असून तिने ही गुड न्यूज शेअर करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
और पढो »
15 लाखाचे पंधराशे रुपये कसे झाले? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत उपस्थित केला प्रश्नठाण्यातील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेसह भाजपवर देखील टीका केली.
और पढो »
'20 वर्ष बाप होता तुमचा, तेव्हा नव्हता का..', 'लाज वाटायला हवी' म्हणत चित्रा वाघ यांच्याविरुद्ध संतापChitra Wagh Comment On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पक्ष फोडीची सगळी मेडल दिली पाहिजेत अशी खोचक टिका करणारी पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे.
और पढो »
विनेश फोटागसंदर्भात हरियाणा सरकारचा ऐतिहासिक निर्णय! CM म्हणाले, 'विनेशचं एखाद्या...'Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: विनेश फोगाट अगदीच अनपेक्षितपणे स्पर्धेबाहेर पडल्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला असतानाच हरियाणा सरकाने मोठी घोषणा केली आहे.
और पढो »