Ishan Kishan On Hardik Pandya: वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
नुकतंच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात हार्दिक पंड्याने खास गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. या सामन्यात शेवटची ओव्हर टाकत टीम इंडियाला हार्दिकने विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने अंतिम सामन्यात 20 धावांत 3 विकेट्स घेतले. ज्यामध्ये धोकादायक फलंदाज हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट्सचा समावेश होता. अशातच आता टीम इंडियाचा युवा खेळाडू ईशान किशनने हार्दिकची बाजू घेतली आहे.
दरम्यान वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, आता ईशान किशनने हार्दिक पांड्याबाबत आपलं मत व्यक्त केलंय. एका वृत्त संस्थेशी बोलताना ईशान किशन म्हणाला की, मला वाटतं होतं की, हार्दिक पांड्या त्याचे प्रयत्न वर्ल्ड कपसाठी वाचवून ठेवत होता. मी त्याचे शब्द कधीच विसरू शकत नाही. 'एकदा मी चांगली कामगिरी केली की आज जे लोक शिव्या देतायत तेच लोक टाळ्या वाजवतील.
ईशान पुढे म्हणाला की, जेव्हा मी खूप कठीण परिस्थितीतून जात होतो तेव्हा त्याने मला हेच सांगितलं, तो म्हणाले, 'लोकांना बोलू द्या, तुम्ही तुमच्या आवडीच्या खेळात सर्वोत्तम प्रयत्न करा आणि तुमचे 100 टक्के द्या.हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 16 रन्सची गरज होती. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर फलंदाजी करत होता. हार्दिक पंड्याच्या पहिल्याच बॉलवर सूर्यकुमार यादवने अप्रतिम कॅच घेत सामना भारताच्या बाजूने वळवला.
कृणालने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, लोकांच्या हिणवण्यापासून त्याच्यावर होणाऱ्या अर्वाच्य टिकेपर्यंत सारंकाही घडलं. पण, तोसुद्धा एक माणूस आहे आणि त्यालाही भावना आहेत हेच आपण विसरलो. त्यानं या परिस्थितून हसऱ्या चेहऱ्यानं वाट काढली. पण हे सर्व किती कठीण होतं हे मला ठाऊक आहे. त्या क्षणापासून त्यानं प्रचंड मेहनत घेतली आणि विश्वचषकाच्या विजयासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. तेच त्याचं ध्येय्य होतं'.
Hardik Pandya Mumbai Indians IPL 2024 T20 World Cup 2024 Ishan Kishan On Hardik Pandya Cricket Sports
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
BCCI: ঈশান-সহ ৮ তারকাকে ছেঁটেই ফেলল বিসিসিআই? ফাঁস তালিকায় ব্রাত্যজনের রুদ্ধসংগীত!8 Players Including Ishan Kishan Snubbed By BCCI
और पढो »
AFG vs BAN: मी आशा करतो तो लवकर...; गुलबदीन नायबच्या दुखापतीच्या नाटकावर काय म्हणाला राशिद खान?AFG vs BAN T20 World Cup 2024: उलटफेर करण्यामध्ये तरबेज असलेल्या गुलबदीन नायबने सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशाविरूद्ध एकच गोंधळ केला. यावेळी सामन्यानंतरही सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा होती.
और पढो »
Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला.
और पढो »
T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.
और पढो »
'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलंHardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.
और पढो »
UPPCS: यूपी में सरकारी नौकरी के लिए हुए इस एग्जाम की दिखाई जा रहीं आंसर सीटUPPSC Answer Sheets: उत्तर प्रदेश लोक सेवा आयोग आज से पीसीएस जे मुख्य परीक्षा-2022 के अभ्यर्थियों को कॉपियां दिखाने जा रहा है.
और पढो »