विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.
T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'
विराट कोहलीने आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाशी संवाद साधला. यावेळी विराट कोहलीने अंतिम सामन्यात आपल्या नेमक्या काय भावना होत्या हे सांगितलं आहे. आपण पूर्णपणे खचलेलो असताना आणि आत्मविश्वास नसताना प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्यावर विश्वास दाखवला असं विराट कोहलीने यावेळी सांगितलं.
दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात 76 धावांची खेळी कऱणाऱ्या विराट कोहलीला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे विराट कोहली संपूर्ण स्पर्धेत अयशस्वी ठरला होता. अंतिम सामन्याआधी त्याने एकूण 75 धावा केल्या होत्या. पण संघाला जेव्हा सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याने जबरदस्त फलंदाजी करत संकटातून बाहेर काढलं.
"सर्वप्रथम, आम्हाला येथे आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. तो दिवस माझ्या आठवणीत कायम राहील कारण मी या स्पर्धेत संघासाठी फारसे योगदान देऊ शकलो नाही. मी राहुल द्रविड भाईला देखील सांगितलं होतं की, मी संघाला आणि स्वत:ला फार न्याय देऊ शकलेलो नाही. पण त्यांनी मला सांगितलं की, जेव्हा संधी येईल तेव्हा तू नक्की परफॉर्म करशील. जेव्हा मी आणि रोहित फलंदाजीसाठी जात होतो तेव्हाही मी रोहितला मला फार आतविश्वास असल्यासारखं वाटत नसल्याचं सांगितलं होतं.
विराट कोहलीने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान आपण एकदिवसीय आणि कसोटी खेळत राहणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलं
Rohit Sharma Narendra Modi Suryakumar Yadav Mumbai Ajit Pawar Indian Cricket Players Felicitation Ceremony
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमTC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
और पढो »
'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलंHardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.
और पढो »
माळशेज घाटात थरार! धबधब्याच्या टोकावर अडकून पडले पर्यटकसह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात आज मुसळधार पाऊस झाला असून या जोरदार पावसामुळे पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते
और पढो »
क्रिकेटर्स सामन्याआधी शरिरसंबंध ठेवतात का? भारतीय क्रिकेटरचा मोठा खुलासा, म्हणाला 'प्रत्येकजण...'युट्यूबर रणवीर अलाहबादियाने (YouTuber Ranveer Allahbadia) मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) विजयात मोलाचा वाटा उचलणारा अभिषेक नायर (Abhishek Nayar) आश्चर्यचकित झाला होता.
और पढो »
सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
और पढो »
'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, मी माणूस आहे.... मला काय
और पढो »