What is CrowdStrike: Microsoft ठप्प पडल्याने जगभरातील बँका, विमानं आणि महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. CrowdStrike अपडेट यामागील एक महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. एका अपडेटमुळे जगभरातील Microsoft 365 च्या सेवांवर परिणाम झाला आहे.
युजर्सला ब्ल्यू स्क्रीन आणि सिस्टीम शटडाऊन सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. Microsoft ठप्प पडल्याने जगभरात हाहाकार माजला आहे. विमानांपासून ते बँका आणि स्टॉक एक्स्जेंजवर याचा परिणाम पाहायला मिळत आहे. कॉन्फिग्रेशनमधील एका बदलामुळे, जगभरातील Microsoft 365 च्या सेवांवर परिणाम झाला असल्याचं बोललं जात आहे. सेवा ठप्प होण्यासाठी CrowdStrike जबाबदार धरलं जात आहे, ज्याच्या एका अपडेटमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. CrowdStrike ही एक अमेरिकन सायबर सेक्युरिटी कंपनी आहे.
याचं मुख्य काम कंपन्यांना हॅकर्स, सायबर हल्ला, डेटी लीकपासून वाचवणं आहे. यामुळे या कंपनीने जगभरातील प्रमुख मोठ्या बँक, विद्यापीठं आणि सरकारी यंत्रणा ग्राहक आहेत. नुकतंच सायबर जगात मोठे बदल झाले आहेत. हॅकर्सकडून हल्ले वाढल्याने अनेकजण CrowdStrike सारख्या कंपन्यांवर अवलंबून आहेत.या कंपनीच्या प्रमुख उत्पादनांपैकी CrowdStrike Falcon एक आहे. कंपनीनुसार, CrowdStrike Falcon युजर्सना रिअल टाइम सायबर हल्ल्याची माहिती देतो. यासह हायपर अॅक्यूरेट डिटेक्शन आणि ऑटोमॅटिक प्रोटेक्शन ऑफर करते.
हजारो कंपन्या याचा वापर करतात. शुक्रवारी सर्व्हरमध्ये एक क्रॅश झाल्याने जगभरात मायक्रोसॉफ्टच्या सेवेत समस्या झाली आहे असं मानलं जात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला CrowdStrike ने आपल्या Falcon प्रोडक्टसाठी एक अपडेट जारी केलं होतं.McAfee चे माजी कर्मचारी George Kurtz यांनी 2012 मध्ये ही कंपनी सुरु केली. या कंपनीचा कोणी एक मालक नाही. अनेक खासगी गुंतवणूकदार, संस्था आणि रिटेल यात भागीदार आहेत.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
और पढो »
सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
और पढो »
10 च्या विद्यार्थिनीसोबत फोटो काढताना साऊथच्या सुपरस्टारने खांद्यावर हात.... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलसाऊथ सुपरस्टार तलपती विजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे या व्हिडीओत.
और पढो »
तब्बल 13 तासांनंतरही कोकण रेल्वे ठप्प; तेजस, तुतारी एक्स्प्रेस स्थानकातच उभ्याKokan Railway: कोकण रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
और पढो »
कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला, पण मुंबईकरांना 'या' वेळेतच करता येणार प्रवासMumbai Coastal Road: कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा टप्पा आजपासून खुला होत आहे. कुठून ते कुठपर्यंत हा मार्ग असणार आहे, हे जाणून घेऊया.
और पढो »
सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »