Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावरणी पार पडली. यावेळी खंडपीठाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.
बदलापूर अत्याचार प्रकरणी मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी आरोपी अक्षय शिंदेबाबत कोर्टात महत्त्वाची माहिती दिली आहे. तसंच, न्या. रेवती मोहिते डेरे व न्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. मुलांना लिंगसमानतेबाबत जागरूक करण्याचे काम समितीने करावे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी बदलापूर अत्याचार घटनेचा तपास व घटनाक्रम न्यायालयात मांडला. त्यावेळी महाधिवक्तांनी उच्च न्यायालयाला महत्त्वाची माहिती दिली आहे. शाळेत सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त होण्याआधी आरोपी अक्षय शिंदे याआधी वॉचमनचं काम करायचा. त्याचा भाऊ व वडिलदेखील त्याच शाळेत काम करत होते. आरोपीने तीन लग्न केली होती. त्याच्या पत्नींचा जबाब घेण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती आत्तापर्यंत समोर आली आहे.
बीरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितले की, कायद्यातील तरतुदी आणि त्याची अंमलबजावणी पाहण्यासाठी स्वयंसेवी संस्था, शाळा आयुक्त, शिक्षण आयुक्त आणि महिला व बाल विभागाचे प्रतिनिधी इत्यादींचा समावेश असलेली समिती नेमण्यात आली आहे. याबाबत 23 ऑगस्ट रोजी सरकारी ठराव मंजूर करण्यात आला आहे.'आपण नेहमी पिडीतेबद्दल बोलतो. काय चूक काय बरोबर हे आपण आपल्या मुलांना का नाही सांगत? मुलांनी काय करायला नको हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. त्यांना मुली, महिलांचा आदर करायला शिकवा, असं कोर्टाने म्हटलं आहे.
जनजागृती केली नाही तर कितीही कायदे असले तरी मदतीला येणार नाहीत. सर्वात वाईट म्हणजे सोशल मीडियाचा वापर. सातच्या आत घरात असा एक चित्रपट आला होता. असे चित्रपट मुलींसाठी का? मुलांसाठी का नाही. मुलांनाही लवकर घरी यायला सांगा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने म्हणणे मांडले आहे.पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी केली नाही. प्राथमिक तपासात त्रुटी आहेत. पोलिसांनी पीडितेला व तिच्या पालकांना पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलवले हे असंवेदनशील आणि कायद्याच्या विरोधात आहे, असे खंडपीठाने म्हटलं आहे.
Badlapur Badlapur Case Badlapur Girls Assault Case Badlapur School Management Victim Family Badlapur School Statement Maharashtra Police महाराष्ट्र बदलापुर बदलापुर अत्याचार प्रकरण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शिक्षणाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....Education News : इयत्ता दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्ष पुढील कारकिर्दीच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाची असतात. पण, विद्यार्थ्यांचा या शैक्षणिक वर्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र आता काही वेगळं सांगून जात आहे.
और पढो »
महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं.
और पढो »
तिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअरMami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
और पढो »
...तर हार्दिकला टीम इंडियात ठेवणं धोकादायक; शास्त्रींनी अगदी स्पष्ट आणि थेटच सांगितलंRavi Shastri On Hardik Pandya: हार्दिक पांड्यासंदर्भात रवी शास्त्रीने सूचक विधान करताना त्याच्यासारख्या खेळाडूला संघात घेणं हे संघाचं समतोल बिघडवणारं कसं असू शकतं हे सांगितलं आहे.
और पढो »
Vinesh Phogat : 'ब्रिजभूषण विरोधात साक्ष देण्याआधीच...', विनेश फोगटचा दिल्ली पोलिसांवर खळबळजनक आरोपVinesh Phogat accuses Delhi Police : आरोपी ब्रिजभूषण विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवल्याचा आरोप विनेश फोगाटने केला आहे.
और पढो »
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; इथून पुढं रेशनच्या दुकानांमध्ये गहू- तांदळासोबतच मिळणार..., फायदाच फायदा!Jan Poshan Kendras : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किमान दरात गहू- तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »