महायुतीतील वाद विवाद आता चव्हाट्यावर आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांन सत्तेतून बाहरे काढण्याची मागणी केली आहे.
महायुती त प्रचंड तणाव असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. अजित पवार ांना महायुती तून बाहेर काढा. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि अजित पवार गटात कलगीतुरा रंगल्याचे अनेकदा पहायला मिळत आहे. त्यातच आता भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार गट सोबत नको अशी जाहीर मागणी केली आहे.
अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये खदखद बोलून दाखवली. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या मानगुटीवर बसलेत अशी जहरी टीका देखील भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा चिंताजनक गोष्टी घडत नव्हत्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय.. त्यांचा रोख पालकमंत्री अजित पवारांवर असल्याची चर्चा आहे. अंमली पदार्थांना उत्तेजन चंद्रकांत पाटील यांच्याच काळात मिळालं, उलट अजित पवारांमुळे अवैध छुपे धंदे उघडकीस आले असा पलटवार अमोल मिटकरींनी केलाय.
महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसतंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती, त्याला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर देत मिटकरी यांच्या तोंडाला आवर घालण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, आता महायुतीतील नेत्यांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.
विधानपरिषदेत 11 पैकी किमान एक जागा पूर्व विदर्भाला द्यावी, अशी मागणी अजित पवार गटाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी केलीय. येणा-या काळात पक्ष संघटना वाढवायची असेल तर संविधानिक पद हे पूर्व विदर्भाला दिलं पाहिजे, असं गुजर यांनी सांगितलंय. तसंच मी स्वत: विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; अजब मागणीमुळे राजकीय व...स्पोर्ट्स
Ajit Pawar Mahayuti BJP Leaders Maharashtra Politics महायुती अजित पवार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
और पढो »
सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
और पढो »
मला मुख्यमंत्र्यांचे दालन द्या; नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्रा कंगना रणौतच्या मागणीमुळे खळबळभाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्रा कंगना रणौतने आपल्या मागणीने खळबळ उडवून दिली. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात दाखल झाली आणि महाराष्ट्र सदनातल्या मुख्यमंत्र्यांच्या सूट म्हणजे दालनाची थेट मागणी केली.
और पढो »
अजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आता महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत ठेवण्यावरुन मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.
और पढो »
'आमच्या वाट्याला...', RSS च्या टीकेवरुन भुजबळांचा टोला; '400 पार'चा फटका बसल्याचाही दावाChhagan Bhujbal On RSS Comment Against Ajit Pawar Group: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपाला महाराष्ट्रात फटका बसल्याची टीका केली होती.
और पढो »
Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजयLoksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय.
और पढो »