आणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार

Mumbai समाचार

आणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार
Centreal Railway22 AugustRailway Passengers
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

Central Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून रेल्वेतून प्रवास करणार आहेत. यासंदर्भात 10 ऑगस्टच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

कधी ओव्हरहेड वायर तुटली, कधी रेल्वेचा डबा घसरला, तर कधी तांत्रिक बिघाड झाला अशी कारण देत मध्य रेल्वे दररोज 15 ते 30 मिनिटं उशीराने धावतेय. पावसाळ्यात तर रेल्वे प्रवशांच्या सहनशक्तीचा अंतच मध्य रेल्वे प्रशासन पाहात असते. मध्य रेल्वे आणि उशीर हे आता जणू एक समीकरणच झालं आहे. विशेषत: सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी कामावरुन परतताना मध्य रेल्वे ला उशीरा रेल्वे चालवण्याचा मुहूर्त मिळतो. त्यामुळे कामावर जाणाऱ्या आणि कामावरुन येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होतात.

कळवा ऐरोली लिंक आणि 5 -6 मार्गिका सारखे महत्वाचे प्रकल्प वर्षानुवर्षे MRVC कडून रखडलेले आहेत . कुर्ला ठाणे कल्याण 5-6 मार्गिका तयार असूनही लोकलच्या मर्गिकेवर रात्रं दिवस मेल चालवल्या जात आहेत.यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रवाशांना आवाहन केलं आहे. 22 ऑगस्टला सफेद कपडे घालून काळी पट्टी लावून रेल्वेने प्रवास करावा आणि आपला पाठींबा दर्शवावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

कल्याण – आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण – बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, हार्बर मार्गाचे विस्तारीकरण, सीएसएमटी – कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका, विरार – डहाणू चौपदरीकरण, कळवा – एरोली उन्नत मार्ग असे अनेक प्रकल्प बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. रखडलेल्या प्रकल्पामुळे नवीन लोकल सेवा सुरू करणे आणि लोकलचा वक्तशीरपणा वाढवण्यावर बंधने येतात. रेल्वे प्रशासनाच्या धीम्या कारभारामुळे प्रवाशांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागतो. प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो.

रेल्वे प्रशासन फक्त लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्याना प्राधान्य देत असून, मुंबईकरांच्या लोकलबाबत काहीही देणे घेणे नाही. गेल्या काही महिन्यांपासून लोकलचा वक्तशीरपणा बिघडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमुळे लोकलला विलंब होतो, असे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. लोकलमध्ये गर्दी होऊन प्रवाशांचा मृत्यू होतो. मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Centreal Railway 22 August Railway Passengers Black Bands Railway Unions मध्य रेल्वे काळ्या फिती रेल्वे संघटना मध्य रेल्वे प्रवासी संघटना Zee 24 Taas Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra ST Bus: लाल परीची भन्नाट ऑफर, स्वस्तात आवडेल तिथे प्रवास; किती रुपये खर्च करावे लागणार?Maharashtra ST Bus: लाल परीची भन्नाट ऑफर, स्वस्तात आवडेल तिथे प्रवास; किती रुपये खर्च करावे लागणार?Maharshtra ST Bus Pass Offer: महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे. खेड्या-पाड्यातून लाल परीच्या फेऱ्या जातात. त्यामुळं लहान पणी गावी जाताना हमखास या लालपरीतून स्वारी निघायची. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात लालपरीची आठवण आहेच. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लालपरी हाल सोसते आहे.
और पढो »

पुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टपुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टMaharashtra Rain Update: महाराष्ट्रात आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे.
और पढो »

⁠रेणुका ईश्वर करनुरे... पूजा खेडकरनंतर पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा धुमाकूळ⁠रेणुका ईश्वर करनुरे... पूजा खेडकरनंतर पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा धुमाकूळपुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. या महिला अधिकाऱ्याने अनेक महिलांची फसवणुक केली आहे.
और पढो »

Mhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवाMhada Lottery : अखेर म्हाडानं मनावर घेतलं; सोडतीत नाव न आलेल्यांसाठी 'इथं' काढणार दुसरी लॉटरी....; डिपॉझिट तयार ठेवाMhada Lottery : म्हाडाच्या आगामी सोडतीसाठी अनेकजण इच्छुक असतानाच या म्हाडाकडून आणखी एकदा सोडतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »

महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »

उरण हत्याकांड: 'तो' कॉल लागला असता तर यशश्री वाचली असती? 2 गोष्टींचा पोलीस घेतायेत शोधउरण हत्याकांड: 'तो' कॉल लागला असता तर यशश्री वाचली असती? 2 गोष्टींचा पोलीस घेतायेत शोधUran Yashashree Shinde Murder Case: 25 जुलै रोजी पनवेल रेल्वे स्थानकाजवळच्या झुडपांमध्ये यशश्री शिंदेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:53:37