Uddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा धारावी पुर्नविकासावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच, मुंबईकरांना आश्वासनदेखील दिले आहे.
मुंबईचा अदानी सिटी करण्याचा डाव सुरू आहे हे मी आधी मांडलं होतं. धारावीकरांना धारावीतच घर मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे. एका धारावीची वीस धारावी कोणी करत असेल तर तो डाव आम्ही होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धारावी पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, 'धारावीकरांना मुलुंड, दहिसर चेक नाका किंवा मिठागर, कुर्ला मदर डेअरीत टाकायचा डाव आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही. विकासकाची जर तिथे जमीनी असतील तर जिथे त्यांनी ट्रान्सिट कॅम्प बांधावे. पण धारावीकरांना घर हे धारावीतच मिळायला पाहिजे. धारावीकरांना बेघर होऊन मुंबईची विल्हेवाट लावून कोणत्या विकासकाचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही.
'आदित्य ठाकरे यांनी रस्ता घोटाळ्याचा विषय मांडला. म्हणजे लाडका कॉन्ट्रेक्टर ही त्यांची नवी योजना आहे. मुंबै बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावर टाकला गेला आणि काही मिनिटांतच तो जीआर मागे घेतला. आता तो जीआर मागे घेतला आहे की कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हा गपचूप कारभार केला गेलेला आहे. रात्रीस खेळ चाले तसा रात्रीच्या भेटीगाठीसारखा हा काही कारभार आहे का?,' असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
'मुळात हा पशुसंवर्धन खात्याचा भुखंड होता. तो काय म्हणून काढला आणि मुंबै बँकेला काय म्हणून दिला. मुंबै बँकेत सरकारमध्ये जे बसलेत त्यांचे चेले आहेत. म्हणून त्यांच्या घशात हा भूखंड काढला का. ही मुंबईची जागा आहे. आमचं सरकार दोन तीन महिन्यात येईल. तोपर्यंत हा निर्णय राहिला तर हा निर्णय आम्ही रद्दच करु, ज्या कामासाठी ते भूखंड ठेवले आहेत. त्या कामासाठीच त्याचा वापर होईल.
Uddhav Thackeray News Uddhav Thackeray On Dharavi Dharavi Redevelopment Tender धारावी पुर्नविकास महाराष्ट्र सरकार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Union Budget 2024: अर्थमंत्र्यांनी 'हा' निर्णय घेतला तर जोरदार आपटेल शेअर बाजार!Union Budget 2024: काही तासांमध्ये देशाचा सर्वसाधारण बजेट सादर केला जाईल. यावेळी सर्वांच्या नजरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर असतील. अर्थसंकल्पाच्या 24 तास आधी अर्थमंत्र्यांनी काही संकेत दिले, ज्यामुळे एक्सपर्ट विचारात पडले आहेत. समजणाऱ्यांना इशारा समजला असेल.
और पढो »
Maharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णयMaharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.
और पढो »
Explained: T-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हार्दिकला उपकर्णधारपदावरुन का काढलं? गिलची वर्णी कशी लागली?Explained Why Hardik Pandya Replaced By Shubman Gill: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेला हा निर्णय हार्दिकच्या चाहत्यांना धक्का देणारा असला तरी यामागील कारणं समजून घेतली पाहिजेत
और पढो »
OPS: पुरानी पेंशन पर बड़ा अपडेट! आई फैसले की घड़ी, आखिरी निर्णय से पहले वित्त मंत्रालय करेगा JCM संग बैठकओपीएस पर केंद्र सरकार कोई अंतिम निर्णय ले, इससे पहले कर्मचारियों के साथ बैठक की जाएगी।
और पढो »
दोन महिन्यात एकाच कुटुंबातील दोन मुलं शहीद; हळहळ व्यक्त करत वडील म्हणाले...नेगी कुटुंबाने 2 महिन्यात गमावले 2 सुपुत्र.. कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
और पढो »
मुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; रविवारी मध्य व हार्बरवर मेगाब्लॉकMumbai Local Megablock Update: मुंबईकरांना उद्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागू शकतो. घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे टाइमटेबल पाहा
और पढो »