विधानसभेची पुनरावृत्ती बीएमसी निवडणुकीत होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासून कंबर कसलीय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला उद्धव ठाकरे लागलेत.
नुकत्याच पार पारपडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दारुण पराभव झाला. पुढच्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. उद्धव ठाकरेंकडे असलेल्या माजी नगरसेवकांपैकी जवळपास 35 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली. त्यामुळे आहेत त्या नगरसेवकांना पुन्हा निवडून आणणं आणि एकनाथ शिंदेकडे गेलेल्या नगरसेवकांना पर्याय देऊन त्या ठिकाणी विजय मिळवण्याचं आव्हान सध्या उद्धव ठाकरेंसमोर आहे.
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मोठी पिछेहाट झालीय. मुंबईतल्या काही जागा राखण्यात उद्धव ठाकरेंना यश आलंय. त्या जोरावर बीएमसी निवडणुकीसाठी मशागत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. उद्धव ठाकरेंनी बीएमसी निवडणुकीसाठी रणनिती तयार केली आहे. यानुसार हिंदुत्वाचा मुद्दा मुंबईकरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न ठाकरेंचा राहणार आहे.
हिंदुत्ववादी भूमिका सोडली म्हणून उद्धव ठाकरेंची पिछेहाट झाली असं काही नेत्यांना वाटू लागलंय. त्यामुळं उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेची निवडणूक समोर ठेऊन पुन्हा बाळासाहेबांच्या आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरेंसाठी आता करो वा मरोची लढाई आहे. बीएमसी हे सत्ताकेंद्र ताब्यात न राहिल्यास उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या शिवसेनेचं राजकीय अस्तित्व टिकवणं कठीण होऊन बसणार आहे.
Marathi News Bmc Election Maharashtra Politics Vidhan Sabha Elections
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला! राऊत उत्तर देत म्हणाले, 'वयाने लहान...'Amit Thackeray Slams Uddhav Thackeray Sanjay Raut Reacts: माहिममधील जाहीर सभेत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा काका असा उल्लेख करत खोचक टीका केल्याचा संदर्भ देत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता.
और पढो »
बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, 'राज ठाकरे काय...'Sanjay Raut On Raj Thackeray Comment About Uddhav: राज ठाकरेंनी दिंडोशीमधील जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचा संदर्भ देत संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
और पढो »
शिंदेंच्या गावी जाण्याच्या टायमिंगवरुन आदित्य ठाकरेंना वेगळीच शंका! म्हणाले, 'चंद्रकलेनुसार...'Aditya Thackeray Slams Mahayuti: आदित्य ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित करताना महायुतीमधील घटक पक्षांवर निशाणा साधला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी राज्यपालांचाही उल्लेख केला आहे.
और पढो »
'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणाAmit Thackeray: माहिम विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी झी 24 तास च्या जाहीर सभेत उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी माहिमकरांचे प्रश्न, राजकारणाचा चिखल, ठाकरे बंधुंचे संबध, स्वत:चे आजारपण अशा विविध विषयांवर भाष्य केले.
और पढो »
Thackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?Thackeray Vs Thackeray:उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरेंचे पुतणे आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय. राज ठाकरेंवर आपण कधीच टीका केली नाही, पण राज ठाकरेंच्या टीकेचा स्तर घसरल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
और पढो »
बीएमसी चुनाव, अस्तित्व का संकट, क्या उद्धव ठाकरे छोड़ेंगे महाविकास अघाड़ी, बचे हैं सिर्फ तीन विकल्प1997 से लगातार बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी) में राज करने के बाद अब हार का संकट मंडराने लगा है। मुंबई के गढ़ में बीजेपी और शिंदे सेना न सिर्फ सेंध लगा चुकी है, बल्कि यूबीटी से ज्यादा ताकतवर होकर उभरी है। अगर ऐसा चुनाव परिणाम बीएमसी चुनाव में आया तो उद्धव सेना का वजूद ही संकट में पड़ जाएगा। ऐसे में पार्टी के कई नेता महाविकास अघाड़ी से निकलने...
और पढो »