Home Ministry News : देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या अनेक दलांच्या कार्यवाहीमध्ये लक्ष घालणाऱ्या गृह मंत्रालयानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत मोठी कारवाई केल्याचं कळत आहे.
देशाच्या राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या अनेक हालचालींचे परिणाम आता अनेक क्षेत्रांमध्ये दिसू लागले आहेत. सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार देशाच्या संरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दलांमध्ये उच्च पदांव तैनात असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची तवार कोसळली असून, या अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आलं आहे.
उपलब्ध माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बीएसएफचे संचालक जनरल नितीन अग्रवाल यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. तर, बीएसएफचे स्पेशल डिजी वायबी खुरानिया यांनाही पदावरून हटवण्यात आलं असून त्यांनाही ओडिशा कॅडर येथे माघारी पाठवण्यात आलं आहे, तर अग्रवाल यांना त्यांच्या मूळ केरळ कॅडर येथे माघारी पाठवण्यात आलं. गृहमंत्रालयाच्या वतीनं या कारवाईला Premature repatriation असं नाव देण्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मागील वर्षभरापासून जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि हल्ले, घुसखोऱीची सत्र पाहता याच कारणामुळं डिजी बीएसएफ आणि स्पेशल डिजी बीएसएफ यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जाणकारांच्या मते जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या सीमाभागावर असणारं दहशतवादाचं सावट पाहता ही सर्वात मोठी प्रशासकीय कारवाई समजली जात आहे.
फक्त जम्मू काश्मीरच नव्हे, तर पंजाब प्रांतातून होणाऱ्या दहशतवादी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणा अपयशी ठरल्यामुळंही ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मागील कैक वर्षांमध्ये इतक्या मोठ्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याची ही पहिलीच वेळ असून, आता त्यांच्या जागी नव्या आणि अधिक कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. देशाच्या संरक्षणार्थ कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, हाच इशारा केंद्रीय गृहमंत्रालयानं या कारवाईच्या माध्यमातून दिला आहे.
BSF DG Renoved BSF Chief Removed Nitin Agrawal YK Khurania Border Security Force बीएसएफ मराठी बातम्या भारत जम्मू काश्मीर काश्मीर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Breaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारीPooja Khedkar News : युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. सिव्हील सर्विस नियमांतर्गत युपीएससीने मोठा निर्णय घेतलाय.
और पढो »
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर विरारमध्ये मोठी कारवाईमिलिंद मोरेंना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. मिलिंद मोरे यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...याप्रकरणी 15 ते 20 जणांवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
और पढो »
कोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणाAssembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
और पढो »
बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगभंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
और पढो »
ICC Ranking मध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा जलवा, 'या' खेळाडूंची मोठी झेपICC Ranking : आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. टी20 आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे.
और पढो »