चीनमधील HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्रात आरोग्य विभाग सतर्क होण्यास सुरुवात केली आहे.
चीन मध्ये मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या HMPV ची भारतात एन्ट्री झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. HMPV चा भारतात पहिला रुग्ण आढळला असून, बंगळुरूतील 8 महिन्यांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलीला ताप आल्यानंतर तपासणी केली असता तिला HMPV ची लागण झाल्याची बाब समोर आली. दरम्यान, चीन मधील HMPV वायरस मुळे महाराष्ट्र ातील आरोग्य विभागानंही सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. घाबरू नका, पण सावध राहा असा सल्ला आरोग्य विभागानं नागरिकांना दिला आहे.
शिवाय सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेशही आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आले असून, स्वच्छतेचे नियमावली पाळण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.IMA चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी झी24 तासशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार चीनमधून जगभरात थैमान घालणारा कोरोना आणि सध्या भीती निर्माण करणारा एचएमपीव्ही व्हायरस यांच्याच कोणतीही तुलना करता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.'हा विषाणू वेगानं पसरत असला तरीही तो इतकासा घातक नसून त्याचा मृत्यूदर अतिशय कमी आहे. त्यामुळं तो वेगानं फोफावत असला तरीही त्याचा मृत्यूदर फारसा वाढत नाही. 2001 मध्येच वैद्यकिय क्षेत्रानं या विषाणूचं आयसोलेशन केलं आहे. यानंतर अनेक देशांमध्ये या विषाणूच्या साथी आल्या, पण त्याचं महामारीत रुपांतर झालं नाही. त्यामुळे आताही महामारी होण्याची शक्यता असून, मृत्यूदरही कमी असल्यानं घाबरण्याचं कारण नाही', असं डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणाले.'2001 पासूनच या आजाराची माहिती असल्यामुळं त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणऊन श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांची काळजी घेतली जाते. 65 वर्षांहून अधिक वय असणारी व्यक्ती, लहान मुलं, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारी मंडळी, एचआयव्ही असणाऱ्या व्यक्तींसाठी हा आजार घातक ठरू शकतो. कोरोनाप्रमाणं सुरुवातीपासूनच या आजारात ऑक्सिजन कमी होण्याची शक्यता कमी असल्यामुळं धोका कमी आहे. असं असलं तरीही न घाबरता चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली, मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं, गर्दीमध्ये जाणं टाळणं याबाबतची काळजी घेतल्यास या विषाणूचा संसर्ग पसरणार नाह
HMPV व्हायरस चीन भारतात एन्ट्री महाराष्ट्र आरोग्य विभाग सतर्कता
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारतात प्रवेश झाला HMPV व्हायरसचीनमधून प्रवेश करणारा HMPV व्हायरस भारतात आढळला आहे. महाराष्ट्र सरकारने याची पाहणी करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
और पढो »
ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) व्हायरस प्रकरणात सतर्कताचीनमधील HMPV व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे भारतात आरोग्य विभागाने सतर्कता वाढवली आहे. दिल्लीत विशेषतः वैद्यकीय सुविधांच्या संचालक डॉ. वंदना बग्गा यांनी बैठक घेऊन रुग्णालयांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही आरोग्य विभाग हा संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे.
और पढो »
महाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणायेत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.
और पढो »
राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »
महाराष्ट्रात नाताळला कडाक्याची थंडी नाहीच, पुढील 10 दिवसांत गारठा कमी होणारमहाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असला तरी पुढील 10 दिवस तापामानात वाढ होणार आहे.
और पढो »
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, हाडं गोठवणारा गारठा कायम राहणारमहाराष्ट्रात देशाच्या उत्तरेकडे वाढलेल्या थंडीच्या पकडेमुळे हाडं गोठवणारा गारठा कायम राहणार आहे.
और पढो »