Nashik Zilla Parishad: नाशिक जिल्हा परिषदेतील 59 कर्मचाऱ्यांना कारवाईचा दणका देण्यात आला आहे. झी 24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाची कारवाई
नाशिक जिल्हा परिषद ेत 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 609 दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी 59 कर्मचाऱ्यांवर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय होता. झी 24 तासच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेत कर्तव्यावर असणाऱ्या 609 दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी 59 कर्मचाऱ्यांवर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय होता. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने यावर कठोर कारवाई करत या 59 कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहे. रुजू झालेल्या तारखेपासून दिव्यांग भत्ता, विशेष सोयी सवलती सुविधा, घेतलेले आर्थिक फायदे, पदोन्नती रोखण्यासोबत व्यवसाय कर ,आयकरातील सवलती वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत शासकीय सेवेतील सर्व विभागांना शासकीय नियमानुसार शिस्त व सेवेतील नियमांचा भंग केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच, वारंवार लेखी सूचना देऊनही दिव्यांद कर्मचाऱ्यांनी त्यांचे युडीआयडी कार्ड सादर केले नव्हते. त्याचबरोबर, महिनाभर मुदत देऊनही वैद्यकीय पडताळणीला टाळाटाळ केली होती. झी 24 तासने बातमी देताच जिल्हा परिषद खडबडून जागे झाले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नाशिकमध्ये जिल्हा परिषदेत बदल्या व विविध कारणांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र वापरण्यात आल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई सुरू झाली होती. आता ही कारवाई अंतिम टप्प्यात आहे. आदेश कारवाईचे जारी झाले आहेत. दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची नोकरीही जाऊ शकते. प्रत्येक विभागांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केल्यास या कर्मचाऱ्यांची नोकरी येत्या काळात जाऊ शकते.'राज ठाकरेंनी मुंबईसोडून...
Nashik Zp News Pooja Khedkar News Pooja Khedkar Live News Pooja Khedkar News In Marathi पूजा खेडकर प्रकरण पूजा खेडकर ताज्या बातम्या नाशिक जिल्हा परिषद नाशिक दिव्यांग प्रमाणपत्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारणाऱ्या 'त्या' मॉलला सरकारचा दणका; केली कठोर कारवाईGT Mall Controversy: धोतर परिधान केल्यामुळे शेतकऱ्याला प्रवेश नाकारणारा बेंगळुरू मॉल तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
और पढो »
झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेशEducation Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.
और पढो »
'झी २४ तास'च्या बातमीचा दणका! आदिती तटकरेंनी पोषण आहाराबाबत अहवाल मागवलासांगलीच्या पूरक पोषण आहाराच्या झी २४ तासच्या बातमीची महिला व बालविकास मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे. आदिती तटकरे यांनी पूरक पोषण आहाराबाबत 48 तासांत अहवाल मागवला आहे. आदिती तटकरे यांनी दोषी आढळल्यास ठेकेदारांचा ठेका रद्द करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
और पढो »
पाकिस्तान क्रिकेटमध्ये व्हायरल व्हिडिओने खळबळ, शाहीन आफ्रिदीवर कारवाई होणार?Pakistan Cricket : पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. टी20 वर्ल्ड कप दरम्यानचा हा व्हिडिओ असून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड याप्रकरणी कारवाई करण्याची शक्यता आहे.
और पढो »
एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणारKalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
और पढो »
गळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळMaharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.
और पढो »