पुणेअपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रय्तन केला जात आहे. यासाठी ड्रायव्हला पैशांचे अमिष दाखवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय.
पुणे कार अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला मोठ्या रकमेचे आमिष दाखवले?
पुणे कार अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला आमिष दाखवल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोर्श कारने जेव्हा दोघांना कारखाली चिरडलं तेव्हा अल्पवयीन आरोपी कार चालवत होता. जमावाने त्याला चोपल्याचंही दृश्यांमध्ये दिसत आहे. मात्र आरोपींकडून कार चालक बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलीस संबंधित ड्रायव्हरचे कॉल रेकॉर्ड्स तपासणार आहेत. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा हे रेकॉर्ड्स तपासणार आहे. पोलिसांनी ड्रायव्हर पुजारीचे सीडीआर म्हणजे कॉल रेकॉर्ड्स काढले आहेत. 19 तारखेला अपघात झाला त्यावेळी हा ड्रायव्हर त्या कारमध्ये होता का हे सुद्धा पोलीस तपासत आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ड्रायव्हरची कसून चौकशी केली.पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन पुणे पोलिसांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली.
पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणातील आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. आतापर्यंत मुलाचे वडील विशाल अग्रवाल, हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक बारचा मालक संदीप सांगळे, हॉटेल कर्मचारी नितेश शेवाणी आणि जयेश गावकर हे 6 आरोपी अटकेत आहेत. आरोपींना पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांना पुन्हा चौकशीसाठी नेण्यात येणार आहेत. याशिवाय मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल आणि ड्रायव्हरचीही आज पुन्हा चौकशी होणार आहे.
Big Twist In Pune Car Accident Case Pune News Pune Crime News पुणे क्राईम न्यूज
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईलपुण्यात पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोपी अल्पवयीन असून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान ही स्पोर्ट्स कार किती वेगात होती हे दाखवणारं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे.
और पढो »
पुणे कार अपघातात धक्कादायक माहिती समोर, बिघाड असलेली पोर्शे कार दिली लेकाच्या हातीPune Porsche Accident Case : महागड्या पोर्श कारच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारने दोघांचा जीव घेतला ती कार बिघाड असलेली होती. यानंतरही ती कार मुलाच्या हाती देण्याची चूक विशाल अग्रवालन केली.
और पढो »
Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनापुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
और पढो »
धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यूप्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर येतंय. या दुर्घटनेत पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
पनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले6 Year Old Son Shoot Intimate Videos: बलात्कार प्रकरणामधील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे कोर्टाने या प्रकरणातील आरोपी आणि याचिकार्त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
और पढो »
'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
और पढो »