Pakistan Media on India: भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. भारताच्या विजयाची विदेशातही चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमातही भारताच्या विजयाची चर्चा सुरु आहे.
Pakistan Media on India: भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. भारताच्या विजयाची विदेशातही चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमातही भारताच्या विजयाची चर्चा सुरु आहे.भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला आहे. भारताच्या विजयाची विदेशातही चर्चा सुरु आहे.
पाकिस्तानातील सर्व वृत्तपत्रं, न्यूज चॅनेल्स आणि माजी खेळाडूंनी भारताचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर भारताच्या विजयाची बातमी छापण्यात आली आहे. माजी खेळाडूंनी रोहित शर्माचं नेतृत्व आणि बुमराहच्या गोलंदाजीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने तर आधीच भारताच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की,"मी वारंवार सांगत होतो की, भारत फक्त हीच स्पर्धा नाही तर एकदिवसीय वर्ल्डकप जिंकण्यासही पात्र होता. रोहितकडून अहमदाबादमध्ये जी चूक झाली ती त्याने आज पूर्ण केली. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांची स्तुती करावी तितकी कमी आहे. हा नक्कीच गोलंदाजांचा सामना होता, पण विराटनेही जबरदस्त खेळी केली.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आमीर सोहेल म्हणाला की,"भारतीय संघाने जबरदस्त खेळी केली. जेव्हा क्लासेन खेळत होता तेव्हा भारतीय संघाच्या खेळाडूंना पाहून ते आता पराभूत होतील असं वाटत होतं. पण बुमराहच्या गोलंदाजीने संघात पुन्हा जीव ओतला". पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांनीही भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं."बऱ्याच दिवसांनी असा सामना पाहायला मिळाला. भारतीय गोलंदाजांनी ज्याप्रकारे स्थितीची योग्य फायदा घेतला त्याचं कौतुक करायला हवं. भारताने अशक्य असा विजय मिळवला. एक खेळाडू तयार करण्यात अनेकांचा हात असतो. यामध्ये राहुल द्रविडचंही मोठं योगदान आहे. जसप्रीत बुमराहने जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या ओव्हरमुळे दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढला.
Ind Vs SA T20 World Cup Shoaib Akhtar Ramiz Raza
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरलअमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे.
और पढो »
'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोललाWhat If India Lose T20 World Cup Final Sourav Ganguly Answers: भारताचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्षपद भूषवलेल्या सौरव गांगुलीने यावर रोहित शर्माचं नाव घेत काय म्हटलं आहे पाहा.
और पढो »
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक, 10 ग्रॅम सोन्याचे दरGold Price Today : आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी सोन्याच, चांददीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आजचे सोन्याचे दर काय?
और पढो »
पुणेकरांवर अदृश्य शक्तीची नजर? 'या' भागात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, गूढ कायमPune Drone News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
और पढो »
फ्रिजमध्ये ठेवूनही आईस्क्रिम का वितळतं? 'या' चुका महागात पडतातअनेकदा फ्रिजमध्ये आईस्क्रिम ठेवूनही ते विरघळतं यामागे नेमकं काय चुकतं? सामान्य वाटणारी चुक तुमचं आईस्क्रिम पाण्यासारखं करतात.
और पढो »
1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?Ram Mandir : रामलल्ला दलदलीत? अयोध्येतील राम मंदिरात पावसानंतर नेमकी काय परिस्थिती? पुजाऱ्यांच्या दाव्यामुळं खरं चित्र समोर
और पढो »