महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Weather Today At My Location समाचार

महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather UpdateRain Weather Today At My LocationMumbai Weather Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather Update: राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा कहर सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने तसे अलर्ट दिले आहेत.

महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर 27 जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचा आंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 25-27 जुलैपर्यंत राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस बरसणार आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

गुरुवारी 25 जुलैरोजी मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. पुण्यात अवघ्या काही तास झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगेने धोका पातळी ओलांडली होती. त्यामुळं नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले होते. तर, कल्याणमध्येही उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडल्याने शहरात नदीचे पाणी शिरले होते. आजही हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

25 जुलै ते 27 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. आजही हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. 27 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईत रात्रभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असून सकाळी चार वाजेपासून पावसाची उसंत घेतली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Weather Update Rain Weather Today At My Location Mumbai Weather Today Mumbai Rain Mumbai Rain Alert Mumbai Rain News Today Maharashtra Rain Today Maharashtra Rain Live Updates

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

काळजी घ्या! ढगफुटी सदृश्य पावसानं कोकणाला झोडपलं; रायगड, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्टकाळजी घ्या! ढगफुटी सदृश्य पावसानं कोकणाला झोडपलं; रायगड, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या सुरु असणाय़ऱ्या पावसानं जुलै महिना अर्ध्यावर येत असताना जोर धरला असून, यामुळं कोकणात अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
और पढो »

महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »

मुंबईत मुसळधार पाऊस; रत्नागिरीला आज रेड अलर्ट; राज्यातील 'या' जिल्ह्यांनाही अलर्टमुंबईत मुसळधार पाऊस; रत्नागिरीला आज रेड अलर्ट; राज्यातील 'या' जिल्ह्यांनाही अलर्टMaharashtra Rain Alert Today: मुंबई, महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळं धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.
और पढो »

काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टकाळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
और पढो »

पुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टपुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टMaharashtra Rain Update: महाराष्ट्रात आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे.
और पढो »

Weather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाजWeather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाजWeather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:55:03