ST Bus Maharashtra: एसटी महामंडळाच्या ताफ्यात आणखी 2500 डिझेल गाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे एसटी. गावागावात आणि खेड्यापाड्यात लाल परी धावते. त्यामुळं खेड्यापाड्यातील नागरिकांना प्रवासासाठी एक साधन आहे. आता लालपरी आणखी वेगाने धावणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 2500 नव्या डिझेल लालपरी बस पुढच्या वर्षी दाखल होणार आहेत. पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
एसटी महामंडळाची अलीकडेच 304 बैठक पार पडली. या बैठकीत 70हून अधिक विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली आहे. एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणखी २५०० डिझेल बस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. त्यानुसार महामंडळ येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया राबविणार असून, पुढच्या वर्षी नव्या गाड्या दाखल होतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
एसटीला नेहमी फायद्यात ठेवण्यासाठी जुनी येणी वसूल करण्यावर भर दिला जात आहे. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 200 कोटी वसूल करण्यात आले आहेत. पुढील सहामाहीतही तेवढेच उत्पन्न अपेक्षित आहे, अशी माहिती डॉ. माधव कुसेकर यांनी दिली आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात 14,000 बसगाड्या आहेत. त्यापैकी 5000 गाड्या एलएनजीमध्ये आणि 1000 गाड्या सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटीचा ताफा आणखी वाढविण्यात येणार आहे.
Buses St ST Corporation St Buses Loksatta News एसटी बस एसटी बस महाराष्ट्र एसटी महामंडळ लालपरी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Big News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 4500 खात्यात जमा होणारआता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
और पढो »
Good News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणारMumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे.
और पढो »
Maternity Leave संदर्भात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! म्हणाले, 'प्रायव्हेट सेक्टरमध्ये असणाऱ्या...'Maternity Leave High Court Order: उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्याने मातृत्व रजेच्या कालावधीसंदर्भात आक्षेप घेणारी याचिका दाखल केली होती.
और पढो »
मेट्रोतून उतरा आणि थेट लोकल, विमानतळ गाठा; मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोपा होणारMumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चे लवकरच लोकार्पण होणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सूकर व दिलासादायक होणार आहे.
और पढो »
मुंब्रा-कळव्यातील नागरिकांचा लोकल प्रवास 'फास्ट' होणार; 5 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदलMumbai Local Train Update: मुंबई लोकलचा प्रवास आता अधिक सूकर होणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी वेळापत्रकात बदल केले आहेत. काय आहेत ते बदल जाणून घेऊया.
और पढो »
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर; माऊंट एव्हरेस्टसोबत केली जाते बराबरीकळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
और पढो »