महाराष्ट्रात तापमान कमी होत आहे आणि थंडी वाढत आहे. सातत्याने घट होणाऱ्या तापमानामुळे जल्दच कडाक्याची थंडी जाणवू शकते. पश्चिम महाराष्ट्रात हिवाळी सहलीसाठी उत्तम ठिकाणे आकर्षणासाठी उत्साहित झाल्या आहेत.
राज्यात वाढत्या थंडीमुळं सूर्याचा दाह कमीच; कधी, कुठे आणि किती प्रमाणात वाढणार गारठा? Maharashtra Weather News : जाणून घ्या 2024 च्या अखेरच्या दिवसांमध्ये कसं असेल हवामान? थंडी नेमकी कुठे वाढणार? हिवाळी सहलींचा बेत आखण्यासाठी कोणती ठिकाणं ठरतील उत्तम?यंदाच्या वर्षी राज्यात थंडीनं काहीशी उशिरानंच पकड मजबूत केली. असं असलं तरीही ऑक्टोबरनंतर मात्र या थंडीनं दडी मारली आणि पुन्हा राज्यात तापमानवाढीचं चित्र पाहायला मिळालं.
इथं ही स्थिती असतानाच मागील दोन ते तीन आठवड्यांपासून सातत्यानं महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात घट होत असल्यामुळं हवामान विभागानं सरत्या वर्षाच्या शेवटासोबतच नव्या वर्षाचं स्वागतही कडाक्याच्या थंडीनं होईल असा अंदाज वर्तवला आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, अतीव उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या पर्वतरांगेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा थेट प्रभाव भारतातील हवामानावर दिसत आहे. ज्यामुळं पर्वतीय भागासह मैदानी क्षेत्रामध्येही तापमानात घट नोंदवली जात असून, दक्षिण भारत वगळता उर्वरित देशामध्येही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात धुळे, नाशिक, परभणी, जेऊर इथं निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात येत असून, या भागांमध्ये तापमानाचा आकडा 4 ते 5 अंशांदरम्यान असल्याची माहिती मिळत आहे. तर, जळगाव, नागपूर, गोंदियासह राज्यातील कोकण किनारपट्टी क्षेत्रामध्येही गारठा जाणवू लागला आहे. गुरुवारी निफाडचा पारा 6 अंशांवर असून, इथं कमाल तापमान 28 इंश असल्याची नोंद करण्यात आली. या थंडीमुळं निफाडमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या.सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुण्यातील घाटमाध्यावरील परिसरामध्ये धुक्याची चादर आणि बोचरी थंडी असं चित्र असल्यामुळं या भागांमध्ये हिवाळी सहली आणि सुट्ट्यांसाठी येणाऱ्यांचा ओघ वाढताना दिसत आहे. थोडक्यात 2024 या वर्षाचा शेवट थंडीच्या लाटेनं झाल्यास नव्या वर्षाच्या स्वागतालाही थंडीचा जोर कायम राहील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.राज्यात चालू आठवडा संपून नव्या आठवड्याच्या सुरुवातीला काहीशी तापमानवाढ अपेक्षित असून, काही भागांमध्ये किमान तापमानातही वाढ होई
Maharashtra Weather Cold Wave Winter Season Temperature Drop Tourist Destinations
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात नाताळला कडाक्याची थंडी नाहीच, पुढील 10 दिवसांत गारठा कमी होणारमहाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असला तरी पुढील 10 दिवस तापामानात वाढ होणार आहे.
और पढो »
नाशिकपासून मुंबईपर्यंत गारठा वाढला; स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडीMaharashtra Weather News : महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून, विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही थंडीची हजेरी पाहायला मिळत आहे.
और पढो »
राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती?Maharashtra Weather News : मराठवाड्यात दितखिळी बसवणारी थंडी, किमान तापमान पाहून म्हणाल काश्मीरला जायलाच नको...
और पढो »
महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी पडणार? गारठा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचाMaharashtra Weather News: राज्यात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. हवामान विभागाने हवामानाचा काय आंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊयाच.
और पढो »
गृहिणींचे बजेट बिघडणार! कडधान्ये, पालेभाज्या, तेलही महागले, कांद्याने आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणीMaharashtra News Today: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महागाईच्या दरात वाढ झाली आहे. काय आहेत दर जाणून घ्या
और पढो »