मराठी आणि हिंदी भाषिक वाद मुंब्र्यात चव्हाट्यावर आला असताना जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
मुंब्र्यातील फळविक्रेत्यांकडून मराठी भाषेवरुन एका तरुणाला धमकावण्यात आल्याचा प्रकार तापलेला असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस चे कळवा- मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. मात्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया नोंदवताना, कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. ठराविक भाषा बोलण्यासाठी जबरदस्ती करणं योग्य नसल्याचं मत मांडताना या प्रकरणाला जातीय रंग न देण्याचं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे.
मुंब्रा येथे मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आल्याचं गुरुवारी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच मराठी भाषेत बोल असं सांगितल्याबद्दल माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुंब्र्यात फळविक्रेत्याला मराठी का येत नाही? असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरून वाद निर्माण झाला. मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. घडलेला संपूर्ण घटनाक्रम मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिंदी येतं तर हिंदीत बोल, असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. व्हिडीओत तरुणाला सर्वांनी घेराव घातलेला दिसत आहे. यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती मध्यस्थी करत काय झालं असं विचारतो. यावेळी तरुण मराठीत सांगू लागताच तो त्याला हिंदीत बोलायला सांगतो. तुला जर हिंदी समजतं तर तुला समजलं ना तो काय बोलतोय ते? अशी उलट विचारणा तो करतो. महाराष्ट्रात राहून त्याला 10 वर्षं झाली तरी मराठी येत नाही असं तरुण सांगत असताना, तो त्याला महाराष्ट्रात असो नाहीतर कुठेही असो येत नसेल मराठी तर काय करणार? अशी उलट विचारणा केली गेली. यादरम्यान तरुणाला शिवीगाळ आणि धमक्याही दिल्या जात असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आह
मराठी हिंदी भाषिक वाद मुंब्रा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस जातीय रंग प्रतिक्रिया
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? अखेर कोर्टाने दिला अत्यंत महत्त्वाचा निर्णयKalyan Durgadi Fort Mandir Or Masjid: मागील अनेक वर्षांपासून हा वाद न्यायालयामध्ये सुरु होता. अखेर या वादावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
और पढो »
मराठी-हिंदी भाषिक वाद: मुंब्र्यात मराठी तरुणालाच माफी मागायला लावलीमुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
और पढो »
'...तर आम्ही एका बापाची औलाद नाही'; मुंब्र्यातील मराठी-हिंदी वादात मनसेची उडी!Marathi Vs Hindi Viral Video Mumbra MNS React: धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर या वादामध्ये आता राज ठाकरेंच्या मनसेने उडी घेतली आहे.
और पढो »
मुंब्र्यात मराठी भाषिक तरुणाला माफी मागायला लावल्यावर राऊतमुंब्र्यात मराठी भाषिक तरुणाला माफी मागायला लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपाला या घटनेसाठी जबाबदार ठरवला आहे.
और पढो »
रामनिवास गोयल ने चुनावी राजनीति से लिया संन्यास, केजरीवाल बोले- 'हमारे लिए भावुक लम्हा'रामनिवास गोयल के चुनावी संन्यास लेने पर अरविंद केजरीवाल ने भी प्रतिक्रिया दी है.
और पढो »
खेसारी लाल यादव के वर्कआउट वीडियो पर रवि किशन का जवाबखेसारी लाल यादव के वर्कआउट वीडियो को लेकर रवि किशन ने अपनी प्रतिक्रिया दी है.
और पढो »