Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस तापदायक ठरणार आहे. रेल्वेकडून तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
रेल्वेकडून रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गावर ठाणे ते कल्याणदरम्यान तर, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान त्याचबरोबर, बोरीवली ते राममंदिर स्थानकादरम्यान रेल्वेने ब्लॉक जाहीर केला आहे. अलीकडेच मुंबईत पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. अशातच रेल्वेने तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आयोजित केल्याने लोकलचे वेळापत्रक बिघडणार आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
रेल्वे रूळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती या ब्लॉक काळात करण्यात येणार आहे. तसंच, या दरम्यान लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून एक्स्प्रेसही 10 ते 15 मिनिटांच्या विलंबाने धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यादरम्यान लोकलचे वेळापत्रक कसे असेल याची माहिती रेल्वेने सविस्तर दिली आहे.ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे.
- पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द असेल. - पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20पर्यंत पनवेल येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहणार आहेत.Weather Update: राज्यात 'या' ठिकाणी पुढचे 2-3 दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाजविश्व
Mumbai Local Train Mega Block Today Mumbai Local Train Mega Block News Mumbai Local Update Mumbai Local Train Update Mumbai News Mumbai Mega Block Today In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Mumbai Mega Block: रविवारी मध्य, हार्बर मार्गावर 'मेगा ब्लॉक'; वाचा संपूर्ण वेळापत्रक!Mumbai Mega Block News: 23 जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
और पढो »
मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
और पढो »
Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, घरातून निघताना लोकलचं वेळापत्रक तपासा! मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉकMumbai Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे
और पढो »
मेगाहाल! मध्य रेल्वेमागोमाग रविवारी पश्चिम रेल्वेचाही मेगाब्लॉक; प्रशासनाकडून प्रवास टाळण्याचं आवाहनमध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु असताना पश्चिम रेल्वेने देखील मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच फरफट होणार आहे. ही फरफट टाळण्यासाठी प्रवाशांना विनाकारण रेल्वे प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
और पढो »
1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8व्या वेतन आयोगाचा आला प्रस्ताव, असे असेल सॅलरी स्ट्रक्चर8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते त्या बातमीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 2024 च्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी 8 वा वेतन आयोग प्रस्तावित आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
और पढो »