मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकतर अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करा.. नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिलाय.. त्यामुळे निकालाचा वाद आता कोर्टाच्या दारात पोहोचला आहे.
रिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला का जात होत्या? मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे खळबळजनक आरोप
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने पुन्हा केलाय.. 19 व्या फेरीनंतर गडबड झाल्याचा दावा ठाकरे पक्षाने केलाय.. आता निकालाचा हा वाद कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचणार आहे. 19 व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली. 19 व्या राऊंडनंतर आमची मतं मोजलीच नाही, असा खळबळजनक दावा अनिल परबांनी केला आहे.
निकालावर ठाकरे गटाने काही आक्षेप घेतले आहेत. आमच्या प्रतिनिधीत आणि एआरओ यांच्यात प्रचंड अंतर आहे. 19व्या फेरीपर्यंत मतं कळायची थांबली होती. ती थेट 22 आणि 23 व्या फेरीनंतर समजली. फॉर्म 17सीमध्ये प्रत्येक ईव्हीएममधल्या मतांची माहिती असते. मात्र हा फॉर्म 17 सी अनेकांना दिला नाही. फॉर्म 17 C part 2 मागणी करुनही दिला नाही. फॉर्म 17 C part 2 द्वारे आमची मते आणि त्यांची मोजलेली मते याची टॅली होते. आयोगाच्या आणि आमच्या मतमोजणीत 650 मतांचा फरक आहे.
रिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला जात होत्या. रिटर्निंग ॲाफिसरला वारंवार फोन येत होते. सीसीटीव्ही फुटेज देण्यास वेळखाऊपणा का? 10 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. 10 दिवसात मोबाईल बदलले गेले असा आरोप ठाकरे गटाने केला. रिटर्निंग ऑफिसरचा इतिहास तपासून बघा. रिटर्निंग ऑफिसरवर किती गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घ्या. रिटर्निंग ऑफिसर किती वेळा निलंबित झाल्या तेही पाहा असे आक्षेप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले आहेत.
Amol Kirtikar Ravindra Waikar Sensational Allegations Thackeray Group Mumbai North West Constituency Lok Sabha Election Results Maharashtra Politics लोकसभा निवडणूक निकाल रविंद्र वा.कर अमोल किर्तीकर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
और पढो »
ठाकरे गटाचे 2 खासदार मोदींना पाठिंबा देणार; नरेश म्हस्केंचा मोठा दावा, 'त्यांना CM शिंदेंसोबत...'Naresh Mhaske Big Claim: ठाकरे गटाचे (Thackeray Faction) 2 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देणार आहेत असा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.
और पढो »
शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी; मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावलीशिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा वाकचौरे यांनी पराभव केला आहे.
और पढो »
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरेमुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.
और पढो »
राष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावाJayant Patil : लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार गटाचे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असा खळबळजनक दावा सूरज चव्हाण यांनी केलाय.
और पढो »
'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोक किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दारAmol Kirtikar : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर आता न्यायालयापुढं निवडणुकीच्या निकालाची दाद मागणार आहेत.
और पढो »