Akshay Shinde Encounter:बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केले होते.
बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे कृत्य केले होते. घटना समोर आल्यानंतर आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत संतप्त बदलापूरकरांनी तब्बल 9 तासांचा रेल रोको केला होता. मात्र याच आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला.. त्यानंतर या एन्काऊंटरवर अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
बदलापुरात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला.आणि आता याच एन्काऊंटरवरुन आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालीय. आरोपी अक्षय शिंदेला बदलापूरमध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्राकडे का नेली?अक्षय शिंदेला पिस्तुलचे लॉक कसे काढता आले? दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढतो? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.ही संपूर्ण घटना राज्य प्रायोजित दहशतवाद आहे असा गंभीर आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलाय.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन सरकारवर आणि पोलिसांवर आरोप होत असताना आता सत्ताधारीही विरोधकांवर तुटून पडले आहेत.. अक्षय शिंदेला हुतात्मा करण्याच्या भानगडीत पडू नका असा इशाराच भाजप नेते आशिष शेलारांनी मविआच्या नेत्यांना दिलाय.दुसरीकडे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील जखमी पोलिसांचा एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनी सत्कार केलाय.तर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील दोन पोलिसांना शर्मिला ठाकरेंनी प्रत्येकी 51 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय..
Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Badlapur Sexual School Case Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault C Akshay Shinde Encounter By Thane Police Who Is Akshay Shinde
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर पिडीतेच्या आजीची प्रतिक्रियाvictims grandmother on Akshay Shinde Death: बदलापूरच्या एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. यानंतर आठवडाभराने म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ही घटना समोर आली. ही घटना समजताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. आरोपी अक्षय शिंदेला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
और पढो »
अक्षय शिंदेला निसर्गाने शिक्षा दिली! शिंदेंच्या खासदाराची सूचक प्रतिक्रिया, राजकारण तापलं!बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर राजकारण तापले आहे.
और पढो »
माझ्या मुलाने कधी फटाके वाजवले नाही तो बंदूक कसा धरेल?, आरोपी अक्षय शिंदेच्या आईचा सवालAkshay Shinde Encounter: अक्षय शिंदे चकमक प्रकरणात अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आता शिंदेच्या आईनेदेखील एक आरोप केला आहे.
और पढो »
अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पोलिसांनी...'Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं ते म्हणाले आहेत.
और पढो »
अक्षय शिंदेच्या मृत्यूचा झाला उलगडा, 7 तासांनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट समोरAkshay Shinde Encounter Post Mortem: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास मुंब्रा बायपासजवळ पोलिस वाहनातच झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला.
और पढो »
राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोपबदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
और पढो »