विरार लोकलचा भार कमी होणार? मेट्रो 9 लवकरच धावणार; अशी असतील स्थानके

Mumbai Metro 9 समाचार

विरार लोकलचा भार कमी होणार? मेट्रो 9 लवकरच धावणार; अशी असतील स्थानके
Mumbai Local News TodayMumbai Local Train UpdateMumbai Local Virar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Mumbai Metro 9: दहिसरहून मिरा-भाईंदरला येणाऱ्या मेट्रो 9चा दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे.

प्रशासनाकडून मुंबईत मेट्रोचं जाळं पसरवण्यात येत आहे. लोकलला होणारी गर्दी आणि त्यातून होणारे अपघात हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. लोकलला होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेकजण हल्ली मेट्रोचा आधार घेताना दिसतात. महामुंबईपर्यंत मेट्रोचे जाळे पसरवण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मेट्रो 3चा पहिला टप्पा काहीच दिवसांत प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. त्याचबरोबर, मेट्रो 9चा पहिला टप्पादेखील या वर्षाअखेर प्रवाशांच्या सेवेत येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दहिसरहून मिरा भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो 9चा पहिला टप्पा या डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे. तर, काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हा दुसरा टप्पा पुढील वर्षी डिसेंबरला खुला होण्याची शक्यता आहे. 2009मध्ये या मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती. मेट्रोचे काम लवकर पूर्ण करुन सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सध्या या मेट्रोचे काम 87 टक्के इतके झाले आहे. तर, दोन टप्प्यात ही मेट्रो सुरू होणार आहे.

मेट्रो 9चा पहिला टप्पा दहिसर ते काशिमीरा या दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. डिसेंबर 2024 पर्यंत ही मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमुळं नागरिकांचा प्रवास सुसज्य आणि जलद होणार आहे. तसंच, नागरिकांना थेट गुंदवली-अंधेरी ते मिरा भाईंदरमधील काशिमीरा दरम्यानचा प्रवास जलद करता येणार आहे. मीरा-भाईंदर शहर मुंबईला जोडण्यासह येथील प्रवाशांचा प्रवास सोप्पा व्हावा, असा शासनाचा प्रयत्न आहे. तसंच, या मेट्रोमुळं दहिसर नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे.

विरार-वसई येथून लोकल भरून येतात. अनेकदा मिरा-भाईंदरच्या प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यास मिळत नाही. तसंच, भाईंदरवरुन सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या मर्यादित आहेत. त्यामुळं मीरा-भाईंदर प्रवाशांनी मेट्रोचा विस्तार भाईंदरपर्यंत करावा, अशी मागणी केली होती. तेव्हा तत्तालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली होती. 2019मध्ये मेट्रोच्या कामास सुरुवात झाली होती. मेट्रो सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांना लोकलच्या गर्दीपासून थोडी सुटका मिळणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Local News Today Mumbai Local Train Update Mumbai Local Virar Mira Bhayandar Metro Mumbai Metro Line 9 मुंबई मेट्रो 9 मुंबई मेट्रो दहिसर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
और पढो »

Good News! नागपूर ते भिवंडी अवघ्या आठ तासांत, कसारा घाटाचा प्रवासही 8 मिनिटांत होणारGood News! नागपूर ते भिवंडी अवघ्या आठ तासांत, कसारा घाटाचा प्रवासही 8 मिनिटांत होणारMaharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग लवकरच प्रवाशांचा सेवेत येणार आहे. आता अंतिम टप्प्याचे काम सुरू असून सप्टेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे.
और पढो »

मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गमुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गKokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
और पढो »

काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टकाळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
और पढो »

Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »

बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातबजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातUnion Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:08:56