Ajit Pawar : केंद्रातले भाजप नेते महाराष्ट्रात आले की त्यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असतात.. आताही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनीही शरद पवारांवर निशाणा साधला. मात्र यामुळे कोंडी झालीय ती अजित पवारांची
पुण्यातल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शाहांनी शरद पवार ांवर जहरी टीका केली. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत असा घणाघात अमित शाहांनी केला. मात्र याच टीकेवरुन आता अजित पवार ांचीच अडचण होत असल्याची दिसत आहे. अजित पवार ांनी शरद पवार ांवरच्या टीकेवर बोलणंच टाळलं. तर दुसरीकडे अमित शाहांची टीका हास्यास्पद असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.अमित शाहांनी शरद पवार ांवर केलेल्या टीकेनंतर आता अजित पवार ांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भटकती आत्माचा उल्लेख केला होता.. मोदींनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, तरीही ती टीका शरद पवारांवरच केल्याचा दावा करण्यात आला. लोकसभा निकालाआधी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर थेट शरद पवारांना संपवण्याची भाषा केली होती.. अजित पवारांनी यावरुन चंद्रकांत पाटलांची खरडपट्टी काढली होती. चंद्रकांत पाटलांनी बारामतीत केलेल्या वक्तव्यामुळे मतं कमी पडल्याचंही अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं..
आताही विधानसभा निवडणुकांआधी अमित शाहांनी शरद पवारांवर जहरी टीका केलीय.. शरद पवारांवरील टीकेमुळे विधानसभेतही भाजपला फटका बसू शकतो असा लेटर बॉम्ब अजित पवारांच्याच नेत्यांनी भाजपवर टाकलाय. आता भाजप नेते यानंतर तरी काही धडा घेतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र यात सर्वात मोठी कोंडी होतेय ती अजित पवारांची..महाराष्ट्र
Ajit Pawar Group MLA BJP Leader Maharashtra Politics अजित पवार शरद पवार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भाजपने काँग्रेसची चूक पुन्हा करू नये….नितीन गडकरींनी आपल्याच पक्षाला का दिला इशारा?Nitin Gadkari Warn BJP Party Workers:भाजपने काँग्रेससारख्या चुका करू नयेत, काँग्रेस करत होती तेच आपण करत राहिलो तर फायदा नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय ते गोव्यामध्ये बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.
और पढो »
विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
और पढो »
अजित पवारांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणारविलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 14 नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली.
और पढो »
'शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार', अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचा आमदार संतापला, 'पुन्हा अशी चूक...'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हटलं असल्याने राजकारण तापलं आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून अजित पवार गटाचे (Ajit Pawar Faction) विलास लांडे (Vilas Lande) यांनी आक्षेप घेतला आहे.
और पढो »
Maharashtra: शरद खेमे में 29 पार्षद जाने के बाद हरकत में आए अजित पवार; एकनाथ शिंदे ने भी बुलाई बैठकMaharashtra: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) के 29 पार्षदों के शरद पवार की पार्टी में शामिल होने के बाद अजित पवार ने पुणे के पार्टी नेताओं की बैठक बुलाई।
और पढो »
बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.
और पढो »