उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर हल्लाबोल लावला आहे. शिवसेनेने म्हटले आहे की फडणवीसांनी राजकीय हेतूने सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात खोटी माहिती दिली आहे.
फडणवीस ांचे 'ते' वक्तव्य राहुल गांधींपेक्षा मोदी ंनी तंतोतंत लागू होते'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल Santosh Deshmukh Somnath Suryawanshi Murder Case:'नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. सूर्यवंशी त्यांच्या आजाराने मेले, असा कांगावा त्यांनी केला.''मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले व आता मंत्र्यांचे बंगले वाटपही पार पडले, पण परभणीत सोमनाथ सूर्यवंशी व बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे नक्की काय झाले? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस सरकार देऊ शकलेले नाही.
सूर्यवंशी व देशमुख यांचे खून झाले व हे दोन्ही खून सरकार पुरस्कृत आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी ‘एसआयटी’ चौकशीचा जो खेळ मांडला आहे, ती धूळफेक आहे,' असा घणाघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.'संतोष देशमुख या सरपंचाची बीडच्या रस्त्यावर निर्घृणपणे हत्या झाली. देशमुख यांना किती निर्घृणपणे मारले याचे हृदय पिळवटून टाकणारे कथन आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केले. आमदार संदीप क्षीरसागर यांनाही हे सर्व सांगताना रडू कोसळले. पण या खून प्रकरणातले खरे आरोपी व सूत्रधार हे सरकारमध्ये सन्मानाने विराजमान आहेत. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अवतीभवती, मंत्रिमंडळात ते वावरत आहेत,' असं सूचक विधान 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आलं आहे.'सोमनाथ सूर्यवंशीची हत्या परभणीत पोलीस लॉकअपमध्ये झाली. संविधान रक्षणासाठी त्यांचे बलिदान झाले. संसदेत संविधानावर चर्चा सुरू असताना पोलीस मारहाणीत सूर्यवंशी मरण पावले. हा सरळ सरळ अत्याचार आहे, पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. सूर्यवंशी त्यांच्या आजाराने मेले, असा कांगावा त्यांनी केला व आता सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी परभणीत आले तर फडणवीस हे वाटाण्यासारखे तडतड करू लागले. फडणवीस म्हणतात, ‘राहुल गांधी हे फक्त राजकीय हेतूने परभणीत आले होते. लोकांमध्ये आणि जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करायचा हे एकच ध्येय त्यांचे आहे. तेच काम ते गेली अनेक वर्षे सातत्याने करीत आहेत.’ फडणवीस यांचे हे वक्तव्य गांधींपेक्षा नरेंद्र मोदी यांना तंतोतंत लागू होते,' असा टोला शिवसेनेनं लगावला आहे
शिसेना फडणवीस मोदी सूर्यवंशी देशमुख हत्या खून राजकारण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Kurla Accident: BEST बसचालक दारु प्यायला होता? शिवसेना MLA ने सांगितलं सत्य; म्हणाला, 'घाबरुन त्याने..'Kurla BEST Bus Accident Real Reason: बस अपघातातील मरण पावलेल्यांची संख्या 6 वर पोहचली असून जखमींची संख्या 49 वर पोहचलेली असतानाच आता खरं कारण समोर आलं आहे.
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठकमहाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा फक्त एका क्लिक वर.
और पढो »
'..तरीही फडणवीसांचे अभिनंदन'; ठाकरेंच्या शिवसेनेच्या कानपिचक्या! म्हणाले, 'फडणवीस जातीयवादी व सुडाने..'Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra New CM Devendra Fadnavis: हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे. राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस कोणत्या दिशेने जाणार आहेत?
और पढो »
देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना आवाहन, 'खोटं सांगणाऱ्या कार्यकर्त्यांचे...'Devendra Fadanvis Appeal to Sharad Pawar:विधानसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. यावरुन महायुतीवर निशाणाल साधलाय.
और पढो »
देवाभाऊ रिटर्न्स! सत्ता गेल्यानंतर फडणवीसांचे 2024मध्ये जोरदार कमबॅकDevendra Fadanvis Comeback: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतायत. मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारणाऱ्या फडणवीसांसाठी हा प्रवास तेवढा सोपा नव्हता. 2019ला स्पष्ट बहुमत मिळून हातून सत्ता गेल्यानंतर फडणवीसांनी 2024मध्ये जोरदार कमबॅक केलंय.
और पढो »
Maharashtra New CM Final Update: महाराष्ट्र सीएम के नाम पर लग गई मुहरमहाराष्ट्र सीएम के नाम पर मुहर लग गई है. देवेंद्र फडणवीस होंगे महाराष्ट्र के सीएम। कल फडणवीस सीएम Watch video on ZeeNews Hindi
और पढो »