हिवाळ्याच्या सुरुवातीत हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मनाली जसे की काही डोंगराळ भागात गेलेल्या हजारो पर्यटकांना यामुळे अडचण झाली आहे.
वर्षाचा शेवट नजीक असतानाच अनेकांचीच पावलं पर्यटन स्थळांच्या दिशेनं वळताना दिसत आहेत. देशाच्या उत्तरेकडे मात्र सध्या एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.हिवाळ्याची चाहूल लागते न लागते तोच अनेकांचे पाय काही ठराविक पर्यटन स्थळांकडे वळतात. हिमाचल प्रदेश हे त्यातचलंच एक नाव. हिवाळ्यात आणि त्यातूनही बर्फवृष्टी ला सुरुवात झाल्यानंतरचं हिमाचल प्रदेश पाहण्याची अनेकांनाच उत्सुकता असते आणि परिणामी दरवर्षअखेरीस कैक पर्यटक या ठिकाणाची वाट धरतात. यंदाचं वर्षही इथं अपवाद ठरलेलं नाही.
मात्र हिमाचल प्रदेशात गेलेल्या पर्यटकांना सहलीचा सुखद अनुभव येण्याआधी मनस्तापच जास्त सहन करावा लागत आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे इथं असणारी वाहतूक कोंडी. हिमाचल प्रदेशातील मनाली आणि डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. ज्यामुळं इथं आलेल्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सध्या हिमाचल प्रदेशात अनेक वाहनं बर्फामध्ये ठप्प झाल्यामुळं कैक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सध्या प्रशासनानं ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पण, प्रवाशांचा मनस्ताप मात्र काही केल्या दूर होताना दिसत नाहीय. सोमवारी रात्री उशिरापासून हिमाचलमधील अटल बोगद्यापासून सोलांगच्या दिशेने शंभरहून अधिक वाहनांमध्ये शेकडो पर्यटक अडकून पडले आहेत. बर्फवृष्टीनंतर निसरड्या रस्त्यांमुळे 1000 हून अधिक पर्यटक वाहनांमध्ये अडकले आहेत. रात्रभर बचावकार्य सुरू असून 800 हून अधिक वाहनांमधील पर्यटकांना मनालीत सुखरूप आणण्यात आलं आहे.तिथं हिमाचलची राजधानी असणाऱ्या शिमला येथे नव्यानं झालेल्या हिमवृष्टीमुळं थंडीचा आनंद द्विगुणित केला आहे. शिमल्यातील निसर्गसौंदर्य यामुळं खुलून आलं असून, इथं मॉल रोड आणि इतर अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे
हिमाचल प्रदेश वाहतूक कोंडी पर्यटक बर्फवृष्टी मनाली सोलांग
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रस्ते होणार अधिक हायटेक, नितीन गडकरी घेऊ शकतात मोठा निर्णय; परदेशातील तंत्रज्ञान राबवणारWhat is AIMC: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उभारणीला होत असलेला विलंब पाहता AIMC ही अद्यावत प्रणाली लागू करु शकतात.
और पढो »
मुंबईला नौदल स्पीड बोटचा अपघात, 13 जणांचा मृत्यूमुंबईतील समुद्रामध्ये नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला धडक दिल्याने 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
और पढो »
... नाहीतर दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही होणार शिक्षा; वाहतूक विभागाचं कठोर पाऊलMumbai News : शिस्त म्हणजे शिस्त... दुचाकीस्वारांसाठी महत्त्वाची बातमी. लक्षपूर्वक वाचा नाहीतर भर रस्त्यात येईल पश्चातापाची वेळ. काय आहे ही बातमी, पाहा...
और पढो »
बसमध्ये फ्लाइटप्रमाणे टीव्ही, चहा-नाश्ता आणि बस हॉस्टेस'; भाडे फक्त 'इतके'; गडकरींचा मास्टरप्लानNitin Gadkari: भारतातील रस्ते, रेल्वे वाहतुकीत गेल्या काही वर्षात महत्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक वाहतूक अधिक वेगवान आणि विविध सुविधांनी सज्ज असलेली पाहायला मिळतेय. केद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सार्वजनिक वाहतुकीसंदर्भात अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा करत असतात.
और पढो »
भुजबळ भाजप वाटेवर? महाराष्ट्र राजकीतीत वेगवेगळ्या चर्चाछगन भुजबळांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादीत राजकीय कोंडी निर्माण झाली आहे. छगन भुजबळांनी भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी सुरू केल्याने त्यांच्या राजकीय भविष्यविधानात बदल झाला आहे.
और पढो »
ठाकरे बंधू एकत्र येणार? राऊत म्हणाले, 'कुटुंब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने...'Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नसोहळ्यात भेट झाली तेव्हापासून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा सुरू झाली आहे.
और पढो »