Bajrang Punia On Brij Bhushan Singh : भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी केलेल्या आरोपाला आता बजरंग पुनियाने शड्डू ठोकून उत्तर दिलंय.
'कानाखाली दिली असती तर...', बजरंगचं बृजभूषण यांना जोरदार प्रत्युत्तर, 'मेडल न आल्याने जे खूश झाले, त्यांची देशभक्ती...'
भारताची प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी कुस्तीच्या आखाड्यातून आता राजकारणाच्या आखाड्या पाऊल टाकलं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी शड्डू ठोकला असल्याने आता भाजपचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय. अशातच आता भाजपकडून बृजभूषण सिंह यांनी मोर्चा सांभाळला असून त्यांनी विनेश फोगाटवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आथा बजरंग पुनियाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
ब्रिजभूषण सिंह यांनी फोगटच्या अपात्रतेवर आनंदी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून ब्रिजभूषण सिंह यांना बजरंग पुनिया यांनी जोरदार उत्तर दिलंय. ब्रिजभूषण शरण सिंह यांची देशाप्रती असलेली मानसिकता समोर आली आहे. हुकलेलं पदक हे विनेशचे पदक नव्हतं. ते पदक संपूर्ण 140 कोटी भारतीयांचं पदक होतं. जे विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करतात, ते देशभक्त आहेत का? असा सवाल बजरंग पुनियाने विचारला आहे. आम्ही लहानपणापासून देशासाठी लढतोय, ते आम्हाला देशभक्ती शिकवणार का? आता तुमची देशाप्रती असलेली मानसिकता समोर आली आहे.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून बाहेर पडली तेव्हा आमच्या कठीण काळात काँग्रेस आमच्या पाठीशी उभी राहिली. इतर आप आणि इतर पक्षही आमच्यासोबत होते. त्यानंतर आम्ही काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पंतप्रधान मोदींकडून आम्हाला कोणत्याही आशा नाहीत. माझ्याविरुद्ध एजन्सींचा वापर करण्यात आला. डोपिंगचा आरोप करत माझ्यावर बंदी घालण्यात आली होती, असंही बजरंगने यावेळी म्हटलं.बृजभूषण सिंह यांनी विनेशवर काँग्रेस प्रवेशानंतर आरोप केले. मी चूकीचा असतो तर मला कानाखाली मारायला हवी होती.
दरम्यान, काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याआधी विनेश फोगाटने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत विनेश फोगाटने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विनेश फोगाट भारतीय रेल्वेत कामाला होती. रेल्वेत ती ओएसडी स्पोर्ट्स या पदावर होती.
Bajrang Punia Congress Brij Bhushan Saran Singh पहलवान विनेश फोगाट बजरंग पूनिया Vinesh Phogat Bajrang Punia On Brij Bhushan Singh
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'20 वर्ष बाप होता तुमचा, तेव्हा नव्हता का..', 'लाज वाटायला हवी' म्हणत चित्रा वाघ यांच्याविरुद्ध संतापChitra Wagh Comment On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पक्ष फोडीची सगळी मेडल दिली पाहिजेत अशी खोचक टिका करणारी पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे.
और पढो »
'कंगनाला बलात्काराचा फार अनुभव, तिलाच...', शिरोमणी अकाली दलच्या प्रमुखांनी अभिनेत्रीला दिलं उत्तरबॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत दावा केला की, जर भारताचं नेतृत्व भक्कम नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती.
और पढो »
लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलाडक्या बहिणी योजनेतील जमा झालेले पैसे झाले बँक खात्यातुन कट झाले आहेत.
और पढो »
Maharashtra Weather News : राज्यात पावसाची उघडीप; मुंबईत हलक्या सरींची बरसात, उकाडा मात्र कायमMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही तासांपासून राज्यात पावसानं चांगलीच उघडीप दिली. तर, काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात पाहायला मिळाली
और पढो »
..तर आमचीदेखील युती तोडण्याची तयारी- भाजपकडून शिंदे गटाला प्रत्युत्तरPravin Darekar On Mahayuti: राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा; तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू , असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले. ठाणंपण आमचं, कोकणंपण आमचंच, जिथे युती आहे तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हीच लढणार, असे लोकसभेला पाहिले.
और पढो »
पूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारीMaharashtra politics : भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
और पढो »