Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री बनण्यची इच्छा आहे पण गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडते, त्याला मी करुन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री बनण्यची इच्छा आहे पण गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडते, त्याला मी करुन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आपला पक्ष महायुतीचा भाग आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेबरोबरच लढणार असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव कार्यक्रमात सहभगी झालेल्या अजित पवार यांनी अनेक मुद्दयावर मतं मांडली.
सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीकरांशी चर्चा झाली होती, पीएम नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलणी झाली, बाकी कोणाबरोबरही चर्चा झाली नाही, लोकं काय बोलतात याच्याशी काहीही घेणं देणं नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेच्या जागावाटपाबाबत अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. भाजप, शिवसेना आणि आपण किती जागा लढणार याबाबत लवकरच कळेल, पण महायुती तुटणार नाही.
महायुती सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहेत. केंद्रात एनडीएचं सरकार आलं आहे, आता महाराष्ट्रातही महायुतीचं सरकार आल्यास त्याचा फायदाच होईल. या अर्थसंकल्पात ज्याप्रमाणे बिहार आणि आंध्रप्रदेशला जास्त निधी मिळाला, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला अधिकचा निधी दिला गेला पाहिजे. यासाठी राज्यात आमचं सरकार आलं पाहिजे, आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्राशी सल्लामसलत करुन तोडगा काढला जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Ajit Pawar Ajit Pawar Maharashtra Polls Ajit Pawar Chief Minister Ajit Pawar News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहाअमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
और पढो »
गणेशोत्सव मिरवणुकींसाठी 13 पूल बंद, धोकादायक पुलांच्या यादीत तुमच्याही परिसराचं नाव?Ganesh Utsav : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण या दरम्यान BMC ने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
और पढो »
डोळ्याचा चष्मा हटवणाऱ्या 'त्या' Eye Drop वर बंदी, सरकारचा मोठा निर्णयप्रेस्वू नावाच्या डोळ्याच्या ड्रॉपने चष्मा कायमचा निघून जात असल्याचा दावा कंपनीने केला होता. पण यावर स्थगिती आणली आहे.
और पढो »
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर! हमीभावापेक्षा अधिक दराने खरेदी करणार; उपमुख्यमंत्र्यांची घोषणाMaharashtra Politics : हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.
और पढो »