करीना कपूरने नुकतीच इंस्टाग्रामला क्लिंट ईस्टवूडचं एक वाक्य शेअर केलं आहे ज्यात म्हटले होते की लक्झरी ही त्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत
करीना कपूरने नुकतीच इंस्टाग्रामला क्लिंट ईस्टवूडचं एक वाक्य शेअर केलं आहे ज्यात म्हटले होते की"लक्झरी ही त्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत"बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला सध्या इंस्टाग्रामला ट्रोल केलं जात आहे. नुकतंच तिने इंस्टाग्रामला हॉलिवूड दिग्दर्शक क्लिंट ईस्टवूड यांचं एक वाक्य शेअर केलं. ज्यामध्ये ऐशोआराम हा पैशांमध्ये नाही, तर आयुष्यातील छोट्या आनदांमध्ये आहे असं सांगितलेलं आहे.
करीनाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये 94 वर्षीय क्लिंट ईस्टवूड यांचा कोट पोस्ट केला आणि त्यासोबत लिहिलं की, “हे वांरवार वाचा .” या कोटमध्ये म्हटलं आहे की आहे, “घड्याळांमध्ये किंवा ब्रेसलेटमध्ये ऐशोआराम शोधू नका, ते हवेली किंवा नौकामध्ये शोधू नका; ऐशोआराम म्हणजे मित्र आणि हसणे, ऐशोआराम म्हणजे आजारी नसणं, ऐशोआराम म्हणजे चेहऱ्यावर पडणारा पाऊस आणि ऐशोआराम म्हणजे मिठ्या आणि किस. स्टोअरमध्ये किंवा भेटवस्तूंमध्ये ऐशोआराम शोधू नका, पार्टी किंवा कार्यक्रमांमध्ये ते शोधू नका.
करीनाच्या या इंस्टाग्राम स्टोरीवरुन अनेकांनी टोला लगावला असून नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने स्टोरीची स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे की, “मला हसू आलं. ऐशोआरामात जगणारे लोक जीवनात ऐशोआराम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट कशी नाही याबद्दल बोलतात". पुढे म्हटलं आहे, “येथे द्वेष किंवा मत्सर नाही, पण मला ते नेहमी मजेदार वाटतं जेव्हा गडगड श्रीमंत लोक जीवनात पैसा हे सर्व काही कसे नाही याबद्दल पोस्ट करतात.
यादरम्यान काहींनी करीनाची बाजूही मांडली आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना तो कमवायचा आहे. पण ज्यांच्याकडे आहे त्यांना पैसा सर्व काही नाही याची जाणीव होते असं एक युजर म्हणाला आहे. दरम्यान चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास करीना आता 'द बकिंघम मर्डर्स', 'सिंघम अगेन' आणि मेघना गुलजारच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे.
Kareena Kapoor Instagram Post Pataudi Palace
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...Vinesh Phogat: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशातील जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. समस्त देशवासिया तिच्या बाजूनी उभे आहेत.अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
और पढो »
Reliance AGM 2024 मध्ये मोठी घोषणा करत अंबानींचं एक पाऊल पुढे! आता थेट Apple, Google ला टक्कररिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा सामन्यांसाठी भरघोस प्लान आणला आहे. यामध्ये त्यांनी Jio AI Cloud लाँच केलं आहे.
और पढो »
Maharashtra Bandh: मुंबईत लोकल, बस उद्या बंद राहणार?Maharashtra Bandh: उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. तसंच लोकल आणि बससेवा बंद ठेवावी असं म्हटलं आहे.
और पढो »
हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाHindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
और पढो »
'कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये, याबाबत मी...'; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने खळबळSupriya Sule Post: सुप्रिया सुळे यांनीच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली असून कोणीही आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये असं त्यांनी आवाहन केलं आहे.
और पढो »
Waqf Bill: 99 टक्के जमीन गुंड आणि बदमाशांच्या ताब्यात; मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष स्पष्टच बोललेWaqf Bill: मध्य प्रदेश मुस्लिम वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सनवर पटेल यांनी आज लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचं स्वागत केलं आहे.
और पढो »