बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आता हंसल मेहता यांच्या होम प्रोडक्शन भैय्याजी मध्ये झळकणार आहे.
'हे कसं काय होऊ शकतं,'...अन् मनोज वाजपेयी बाथरुममध्ये जाऊन रडू लागला, हंसल मेहता ठरले होते कारणUpdated: May 12, 2024, 03:58 PM IST
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आपल्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. आपली मतं जाहीरपणे मांडताना तो जास्त विचार करत नाही. आपल्या प्रायव्हेट आणि प्रोफेशनल लाईफबद्दल तो नेहमीच सांगत असतो. हे सांगताना तो आपल्या मित्र आणि सहकाऱ्यांसह झालेल्या भांडणांबद्दलही थेट सांगतो. सिद्धार्थ कनन्नला दिलेल्या मुलाखतीत मनोज वाजपेयीने हंसल मेहता यांच्यासह झालेला वाद आणि त्याचा परिणाम याबद्दल सांगितलं.
संघर्षाच्या दिवसांमध्ये हंसल मेहता यांच्यासह झालेल्या वादाबद्दल मनोज वाजपेयीने खंत व्यक्त केली आहे. जेव्हा हंसल मेहता यांच्यावर शाई फेकण्यात आली होती तेव्हा आपल्याला नेमकं काय वाटलं होतं याबद्दलही त्याने सांगितलं. तो म्हणाला की,"आमच्यासाठी तो फार कठीण काळ होता. मी मेहतनतीने तयार केलेलं करिअर हातातून निसटत होतं. अनेक नकोशा व्यक्ती प्रोजेक्टमध्ये आल्या होत्या. यामधील काही माझ्यामुळे आणि काही हंसल मेहतामुळे आल्या होत्या. यानंतर गोष्टी सरळ राहिल्या नाहीत.तुम्हाला वाईट वाटतं.
तो पुढे म्हणाला, “तुम्ही भक्कम असलात तरी एका क्षणानंतर तुम्ही खचता.घडलेल्या प्रकारामुळे आम्ही एकमेकांवर ओरडणे संपवले. पण आज तुम्ही मला विचाराल तर मी ते मनात ठेवलेलं नाही.हंसल अनुराग , रामू किंवा मी असो, हा आमच्या प्रवासाचा भाग होता.आमच्यात अनेक वाद झाले.पण मला एकच अडचण होती की माझ्या भावना रागाच्या भरात होत्या.मी रागातून व्यक्त व्हायचो.त्यामुळे माझ्या मित्रांना जास्त त्रास व्हायचा.मी त्यांच्यासमोर रडलो असतो तर ते नाराज झाले नसते पण माझ्या भावना नेहमी रागाच्या रूपात बाहेर पडतात.
मनोज आणि हंसल मेहता यांनी 'दिल पे मत ले यार'मध्ये एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात तब्बू, आदित्य श्रीवास्तव, सौरभ शुक्ला आणि विजय राज होते. त्यांनी राजकुमार राव सह-अभिनेता असलेल्या सामाजिक बायोपिक-ड्रामा अलीगढमध्ये देखील एकत्र काम केले. मनोज वाजपेयी सध्या भैय्याजी चित्रपटात झळकणार आहे.शेखर सुमनने सांगितला 'तवायफ' आणि 'देहविक्री करणाऱ्या महिलां'मधला फरक! म्हणाला, 'तेव्हा मुलांनाही हिरामंडीला...
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...अन् पाकिस्तानी चिमुरडा मैदानातच ढसाढसा रडू लागला, खेळाडूंसह अख्खं मैदान त्याच्याकडे पाहत राहिलंन्यूझीलड (New Zealand) संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात (Pakistan) दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत.
और पढो »
LokSabha Election; निवडणूक होण्याआधीच भाजपाने सूरत जिंकली, पण ते कसं काय?LokSabha Elections 2024: सूरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिलं कमळ दिलं आहे असं गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसंच लोकसभेचे उमेदवार मुकेश दलाल यांचं अभिनंदन केलं आहे.
और पढो »
सत्या फिल्म की सक्सेस पार्टी का 26 साल पुराना वीडियो वायरल, 24 की उर्मिला और 28 के मनोज वाजपयी को देखकर कहेंगे ओल्ड इज गोल्डसत्या की सक्सेस पार्टी के वीडियो में उर्मिला और मनोज वाजपेयी
और पढो »
पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे नेते आता त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरताना दिसत आहेत.
और पढो »
'आपले महाराजही हुकूमशहा होते! पण...' मुलाखतीत हे काय बोलून गेला अवधूत गुप्ते?अवधूत गुप्ते हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नेहमीच स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असणारा अवधूत गुप्ते त्यांच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे.
और पढो »
IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
और पढो »