भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) जर रोज मटण खाल्लं नाही, तर त्याचा गोलंदाजीचा वेग ताशी 15 किमीने कमी होईल असा दावा त्याचा मित्र उमेश कुमारने (Umesh Kumar) केला आहे.
'...तर तिसऱ्या दिवशी तो वेडापिसा होतो,' मोहम्मद शमीच्या जवळच्या मित्रानेच केला खुलासा, 'त्याला रोज...'
भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने जर रोज मटण खाल्लं नाही, तर त्याचा गोलंदाजीचा वेग ताशी 15 किमीने कमी होईल असा दावा त्याचा मित्र उमेश कुमारने केला आहे.भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी मटण खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाही असा खुलासा त्याचा अत्यंत जवळचा मित्र उमेश कुमारने केला आहे. जर मोहम्मद शमीने रोज एक किलो मटण खाल्लं नाही, तर त्याचा गोलंदाजीचा वेग ताशी 15 किमीने कमी होईल असंही त्याने उपहासात्मकपणे म्हटलं आहे.
"जर त्याने रोज एक किलो मटण खाल्लं नाही, तर त्याचा गोलंदाजीचा वेग ताशी 15 किमीने कमी होईल." असं उमेश कुमारने सांगितलं. पॉडकास्टमध्ये त्याने मोहम्मद शमी जास्तीत जास्त एक दिवस मटणाशिवाय राहू शकतो असाही खुलासा केला."मोहम्मद शमी काहीही सहन करु शकतो, मात्र मटणाशिवाय जगू शकत नाही. तो एक दिवसासाठी सहन करु करतो. दुसऱ्या दिवशी तो निषेध करेल आणि तिसऱ्या दिवशी तर वेडापिसा होईल," असं उमेश कुमारने सांगितलं.
मोहम्मद शमी एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये मैदानावर अखेरचा दिसला होता. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये त्याने आपल्या स्फोटक गोलंदाजीने अक्षरश: वादळ आणलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेत तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. मात्र दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून सध्या दूर आहे.मोहम्मद शमीला शॉपिंगची फार आवड असल्याचंही यावेळी उमेश कुमारने सांगितलं. मालिकेनंतर घऱी असताना त्याला जेव्हा शक्य असेल तेव्हा मॉलमध्ये जायला फार आवडतं असं उमेश कुमार म्हणाला."मोहम्मद शमीला शॉपिंगची फार आवड आहे.
मोहम्मद शमी गुडघ्याच्या दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. दुखापतीमुळेच तो टी-20 वर्ल्डकप खेळू शकला नाही. मोहम्मद शमी संघात कधी परतणार यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेत सांगितलं होतं."त्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला आहे. आमचं नेहमी तेच लक्ष्य होतं . तोपर्यंत तो संघाकडून खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे की नाही यासंदर्भात मला एनसीएमध्ये चर्चा करावी लागेल." असं गौतम गंभीरने सांगितलं.
Umesh Kumar Indian Cricket Indian Cricket Team Mutton
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »
अमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सलEmraan Hashmi: इम्रान हाश्मी याने अलीकडेच एक खळबळजनक खुलासा केला आहे.
और पढो »
Yogini Ekadashi : श्रीहरि विष्णूच्या नावावारुन मुलांची नावे, अर्थ देखील तितकाच महत्त्वाचाYogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरि विष्णूची पूजा केली जाते. आजच्या दिवशी जन्मलेल्या मुलासाठी खास नावे.
और पढो »
रोज केला खाने के फायदे जानकर हो जाएंगे हैरान! तुरंत शुरू कर देंगे खानारोज केला खाने के फायदे जानकर हो जाएंगे हैरान! तुरंत शुरू कर देंगे खाना
और पढो »
'हे बघ तुला जर....', गौतम गंभीरने हार्दिक पांड्याला फोनवरुन स्पष्टच सांगितलं, कॉल डिटेल्स आले समोरबीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यात झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे.
और पढो »
'त्याने मला...', 'मिर्झापूर'मधील इंटीमेट बेडरुम सीनबद्दल 'सलोनी भाभी'चा खुलासा; म्हणाली, 'मी स्वत:ला..'Intimate Bedroom Scene In Mirzapur Season 3: मिर्झापूर मालिकेमधील या सीनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून या सीनसंदर्भात आता अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे.
और पढो »