Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका भन्नाट राजकीय खेळीने वांद्रे पूर्व मतदारसंघातील निवडणूक अधिक रंजक झाली आहे. मनसेनं ऐनवेळी या मतदारसंघातून एक तगडा उमेदवार दिला असून या उमेदवारीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि ठाकरे कुटुंबियाचे नातेवाईक असेलल्या वरुण सरदेसाईंचा मार्ग अधिक खडत झाला आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या झिशान सिद्दीकींनाही राज ठाकरेंच्या या खेळीमुळे तगडं आव्हान मिळणार आहे.
मुंबई भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा आणि माजी आमदार श्रीमती तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि आज त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी जाहीर झाली.तृप्ती सावंत हे वांद्रे येथील राजकारणामधील मोठं नाव आहे. खरं तर त्या पतीच्या निधानंतर म्हणजेच 2015 नंतर राजकारणात सक्रीय झाल्या. तृप्ती सावंत यांनी लढवलेली 2015 मधील वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक गाजली होती. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं.
'मातोश्री'च्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं. या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास 20 हजारांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव केला होता. तृप्ती सावंत यांच्या विजयानंतर त्यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करताना हद्द पार केली होती. शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करताना हातात कोंबड्या घेऊन राणेंविरोधात घोषणा दिल्या जात होत्या. काही वर्षांपूर्वी याच पराभवावरून अजित पवार यांनीदेखील नारायण राणेंची खिल्ली उडवली होती.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Bandra East Constituency
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ठाकरेंच्या कठोर निर्णयानंतर 'लालबागचा राजा'च्या चरणी सापडलेली 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेतMaharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena: जागावाटपाचा तिढा सुटत आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात असतानाच आता यंदा लालबागच्या राजाच्या चरणी सापडलेली ती चिठ्ठी पुन्हा चर्चेत आली आहे.
और पढो »
उद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत 'हे' 3 शिलेदारShivsena Third List of Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत.
और पढो »
ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहाMaharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये मुंबईमधील आठ जागांचा समावेश असून एकूण 31 जागांवरील संभाव्य उमेदवार कोण असतील याची माहिती समोर आली आहे.
और पढो »
'काहीही करा मात्र...', ठाकरेंबरोबरच्या वादावरुन राज्यातील नेत्यांनी खरगेंना स्पष्टच सांगितलं; वाद चिघळणार?Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेदरम्यानच्या वादावर राज्यातील नेत्यांनी पक्षाध्यक्षांना काय संदेश पाठवलाय जाणून घ्या
और पढो »
मोठा राजकीय भूकंप? 'शिवसेनेचं 2 ठिकाणी बोलणं, राऊत शाहांना भेटले'वर काँग्रेस म्हणाली, 'कोण कोणाला...'Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद असल्याची जोरदार चर्चा असतानाच अन्य एका वेगळ्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
और पढो »
मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हानCM Eknath Shinde Dasara Melava Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.
और पढो »