Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारावर एका टोळक्याने हल्ला केला आहे.
उल्हासनगर येथे घरात घुसून डॉक्टर आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. पण या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना हटकल्याचा राग मनात धरून आरोपींनी डॉक्टरवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या एका दुचाकीस्वार तरुणांना हटकल्याचा राग येऊन डॉक्टराच्या घरी जाऊन 10 ते 15 जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाच परिसरात घडली आहे,ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
रात्री कॅम्प नंबर पाचच्या कैलाश कॉलनी रस्त्यावरून डॉ सागर धुतोडे हे घरी जात होते. त्याचवेळी एक बाईकस्वार तरुण स्टंटबाजी करत होता. तेव्हा डॉक्टरांनी या तरुणांना हटकले होते व घरी निघून गेले. मात्र डॉक्टरांनी हटकल्याचा राग या तरुणांनी मनात धरुन ठेवला होता.शनिवारी रात्री, याच तरुणाने 10 ते 15 जणांची टोळी घेऊन डॉक्टरांच्या घरी जाऊन लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात सागर आणि त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.
Ulhasnagar News Ulhasnagar News Today Ulhasnagar Viral Video उल्हासनगर ताज्या बातम्या उल्हासनगर आजच्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
VIDEO : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन! खुलासा करत म्हणाला...डेडपूल आणि व्हॉल्व्हरिन मध्ये पुन्हा दिसणाऱ्या हॉलिवूड स्टार ह्यू जॅकमॅननं त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूच्या प्रतिभा आणि खेळाचे कौतुक केले.
और पढो »
एका दिवसात सिगारेटचं अख्खं पाकिट संपवायचा, घशाचा फोटो पाहिल्यानंतर डॉक्टरही चक्रावले, तिथे चक्क...सतत खोकला, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एक व्यक्ती जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याच्या घशाचा आतील भाग पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.
और पढो »
भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटनाभारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या (Nanded) श्रीनगर (Srinagar) भागात ही घटना घडली आहे. टोळक्याने घऱात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली.
और पढो »
23 वर्षांची तरुणी, कार चालवतानाचे रिल्स शूटींग आणि खोल दरी!..पुढे घडलं ते धक्कादायकSambhaji Nagar Accident: सध्या रिल्स बनवण्याच्या ट्रेण्ड आलाय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला असून सर्वजण रिल्स बनवून लाईक्स, कमेंट्स कशा मिळतील, याकडे लक्ष देतात. पण हेच रिल्स कधी जीवाशी बेतेल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला.
और पढो »
Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णनJammu and Kashmir Accident : हल्ला आणि त्यानंतरच्या भीषण अपघातानंतर जम्मू काश्मीरमधून घटनास्थळाची काही दृश्य समोर आली आहेत. पाहताच उडेल थरकाप...
और पढो »
अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण...नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनावर मोकळेपणानं सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूचं कारण सांगित असताना ते भावूक झाले.
और पढो »