Dhule Shindkheda Accident: संभाजीनगरनंतर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
: छत्रपती संभाजीनगर येथील अपघाताची घटना ताजी असतानाच धुळे जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात घडला आहे. पिकअप व्हॅन आणि ईको गाडीचा अपघात झाला असून या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात झाला. पिकअप व्हॅन आणि ईको गाडीत समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांच्या चक्काचुर झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मयतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते. त्यादरम्यान भरधाव पिकपने या वाहनाला धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. दीपक असं या पिकअप वाहन चालकाचे नाव असून तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला या अपघातात किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांवर हिरे येथील वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.संभाजीनगर येथे 14 सप्टेंबर रोजी भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती.
धुळे शिंदखेडा तालुका अपघात शिंदखेडा दसवेल फाटा अपघात दसवेल फाटा पिकअप ईको अपघात Dhule Accident Dhule Shindkheda Taluka Accident Shindkheda Dasvel Phata Accident Dasvel Phata Pickup Eco Accident Maharashtra News In Marathi Drunk And Drive Dhule Hit And Run
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रातील प्रवाशांनी भरलेली बस नेपाळमध्ये नदीत कोसळली; 14 जण ठारNepal Bus Accident: नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील होते. या दुर्घटनेत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
Kajol, राणी मुखर्जीचा भाऊ सम्राट मुखर्जीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?Samrat Mukherjee Arrest : काजोल आणि राणी मुखर्जीचा भाऊ सम्राट मुखर्जीला अटक करण्यात आलीय. सम्राटवर भरधाव वेगाने कार चालवत दुचाकीस्वाराला धडक दिलीय.
और पढो »
10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेशChhatrapati Sambhaji Nagar Accident: पुण्यावरुन परत येत असताना या कुटुंबाच्या कारला समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.
और पढो »
गणेशोत्सवाआधीच भाज्या महागल्या, 10 ते 20 टक्क्यांनी दरवाढीमुळं सणावाराचं बजेट कोलमडणारगणेशोत्सवाची धूम सगळीकडे असताना बजेट कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.
और पढो »
'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
और पढो »
पुन्हा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची; पोलिसांच्या बदलीशी कसा आहे थेट संबंध?Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका नेमक्या कधी पार पडणार? याविषयीचीच उत्सुकता असताना अखेर त्यासंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे.
और पढो »