Women Police in India : भारतात 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत. पण यात महिला पोलिसांची संख्या 10 टक्क्यांहून कमी आहे. महिलांसाठी आरक्षण केवळ कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांसाठी लागू होतं.
कोलकाताच्या आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि लहान मुलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी राज्यात विशेष 'अपराजिता टास्क फोर्सची' स्थापना केली. या पथकात केवळ महिला पोलीस अधिकारी असणार आहेत. देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या तुलनेत महिला पोलिसांची संख्या खूपच कमी आहे. पश्चिम बंगालमध्ये महिला पोलिसांची संख्या केवळ 9.6 इतकी आहे.
देशभरात एकूण 27 लाख 22 हजार 669 पदं मंजूर असून, यापैकी तब्बल 5 लाख 51 हजार 364पदे रिक्त आहेत. राज्य विशेष सशस्त्र पोलीस दलात 63,078 पदे, राखीव बटालियन मध्ये 28,552, जिल्हा सशस्त्र राखीव पोलीस दलात 86,865 आणि सिव्हिल पोलिसांमध्ये 4,02,869 पदे रिक्त आहेत.ब्यूरो ऑफ पोलीस रिचर्स अँड डेव्हलपमेंटच्या रिपोर्टनुसार 1 जानेवारी 2023 पर्यंत देशात 2 लाख 63 हजार 762 महिला पोलीस आहेत. यात सिव्हिल, डीएआर, स्पेशल आर्म्ड आणि आयआरबी यांचा समावेश आहे. देशातील एकूण पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 12.32% महिला पोलीस आहेत.
2021 मध्ये 2 लाख 46 हजार 103 महिला पोलिसांच्या तुलनेत 2023 मध्ये ही संख्या 7.18% टक्क्यांनी वाढली. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एकूण 42,986 महिला पोलीस आहेत. यात सर्वाधिक महिला पोलीस या सीआयएसएफमध्ये आहेत. CISF मध्ये 10,001 महिला पोलीस आहेत.ब्यूरो ऑफ पोलीस रिचर्स अँड डेव्हलपमेंटच्या रिपोर्टनुसार सर्वात जास्त 33,319 महिला पोलीस उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्रात महिला पोलिसांची संख्या 32,172 इतकी आहे.
केंद्र शासित प्रदेशाचा विचार केला तर लढाखमध्ये सर्वात जास्त म्हणजे 29.65% इतक्या महिला पोलीस आहेत. लढाखमध्ये एकूण 2621 पोलीस आहेत. यात 777 महिला पोलीस आहेत. याशिवाय लक्ष्यद्वीप , दादर आणि हवेली , पुद्दुचेरी , सिक्किम , अंदमान निकोबार यांचा समावेश आहे.देशातील काही राज्यात महिला पोलिसांची संख्या 10 टक्क्यांहून कमी आहे.
Women In Police Maharashtra Police Bengal Police Delhi Police Bihar Police UP Police PUNJAB POLICE Data On Police Organizations Parliamentary Standing Committee Bureau Of Police Research And Development BPR&D Most Women In Police
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Weather News : पावसाचं काही खरं नाही! चक्रीवादळ येतंय... पण कुठे? मान्सूनचं काय चाललंय?Maharashtra Weather News : देशभरात पावसाचा जोर वाढणार, महाराष्ट्रात मात्र लपंडाव सुरूच; हवामानाची स्थिती नेमकं काय सुचवू पाहतेय?
और पढो »
आजपासून महागला LPG गॅस सिलिंडर, मुंबई-दिल्लीत किती रुपयांनी वाढले दर?LPG Cylinder Latest Price: देशात पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत किती असतील दर वाचा
और पढो »
Maharashtra Weather News : राज्यात कुठं पाऊसधारा, कुठं उष्ण वारा? पाहा सविस्तर हवामान वृत्तMaharashtra Weather News : मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी, उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाळ्याच उन्हाळ्याची जाणीव... पाहा हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
और पढो »
Breaking News Live Updates : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यातBreaking News Live Updates : राज्यासह देशात राजकारणापासून इतर सर्व क्षेत्रांपर्यंत नेमकी काय आणि कशी परिस्थिती? पाहा Live Updates
और पढो »
Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या.
और पढो »
'कंगनाला बलात्काराचा फार अनुभव, तिलाच...', शिरोमणी अकाली दलच्या प्रमुखांनी अभिनेत्रीला दिलं उत्तरबॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत दावा केला की, जर भारताचं नेतृत्व भक्कम नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती.
और पढो »