Nepal Plane Crash Latest News: नेपाळमध्ये त्रिभुवन विमानतळावर विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात 17 जण दगावल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका विमानाचा भीषण अपघात झाला आहे. विमान टेक ऑफ करताना क्रॅश होऊन अपघात घडला आहे. यावेळी विमानात 19 प्रवासी होते. तर. आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सौर्य एअरलाइनचं हे विमान असल्याचे समोर येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
द काठमांडू पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान काठमांडूवरुन पोखरा येथे जात होते. टेक ऑफ करताना रनवेवरुन घसरल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सौर्य एअरलाइनचे विमान नंबर 9N-AME चा अपघात झाला आहे. अपघातानंतर विमानातून आगीचे लोट बाहेर पडत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मदत व बचतकार्य सुरू करण्यात आले आहे. बचावपथकाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आग विझवण्यात आली आहे. तर, आत्तापर्यंत 17 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर, अन्य प्रवाशांचा शोध सुरू आहे. या अपघातातून पायलट बचावला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा येताच त्याच्याकडे अपघाताविषयी चौकशी करण्यात येणार आहे.या विमान अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत.
Plane Crash Nepal Nepal Plane Crash Today Nepal Plane Crash Latest News Saurya Airlines Plane Crash Today Nepal Plane Crash News Nepal News Kathmandu International Airport
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमीSamruddhi Mahamarg accident News today: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक,दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू
और पढो »
कल्याण-नगर हायवेवर भीषण अपघात! अत्यंस्कारावरुन परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यूKalyan Ahmadnagar Highway Accident: महाराष्ट्रातील कल्याण आणि अहमदनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर आज सकाळच्या सुमार भीषण अपघात झाला.
और पढो »
Big News : डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; पाच ठारMumbai Pune Expressway मार्गामुळं प्रवासातील वेळेची बचत करत कमाल अंतर ओलांडण्याच्या हेतूनं जाणार असाल तर, सावध व्हा! एकही चूक संकटात नेऊ शकते...
और पढो »
लोणावळ्यातील भुशी डॅमजवळ एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेलेलोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले.
और पढो »
काठमांडू एयरपोर्ट पर टेक ऑफ करते ही प्लेन क्रैश, जलकर हुआ खाक, देखेंनेपाल के काठमांडू में त्रिभुवन इंटरनेशनल एयरपोर्ट पर बड़ा विमान हादसा हो गया है. यहां प्लेन क्रैश हो गया है. इस हादसे की तस्वीरें सामने आई हैं, जिसमें धुआं उठता दिख रहा है. स्थानीय लोगों ने इस घटना को कैमरे में कैद किया है. बताया जा रहा है कि टेकऑफ के दौरान रनवे पर विमान फिसल गया.
और पढो »
टँकरला कापत गेली डबल डेकर बस, 18 जण जागीच ठार; अपघाताचा VIDEO पाहून अंगावर येईल काटाUnnao Accident : आगरा लखनऊ एक्स्प्रेस वेवर डबल डेकर बस आणि दुधाच्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 18 जण जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढत आहे.
और पढो »