Mumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य आणि शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामं हाती घेतली आहेत. मात्र या कामांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधीच कळवण्यात येतं.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे 29 लाख 75 हजार झाडं आहेत. यापैकी 15 लाख 51 हजार 132 एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर 10 लाख 67 हजार 641 झाडं शासकीय इमारती तसंच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी 1 लाख 86 हजार 246 झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. यंदा मुंबई महानगरात एकूण 1 लाख 12 हजार 728 झाडांची छाटणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 12 एप्रिल 2024 अखेरपर्यंत 15 हजार 821 झाडांची छाटणी झाली आहे.
Car Parking Bmc Mumbai Municipal Corporation Parking Cars Under Trees BMC Apeal To Car Owners मुंबई महानगर पालिका झाडांची छाटणी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोठी बातमी: शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह तब्बल 98 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त!मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीनं ज्या मालमत्तेला अटॅच केलं आहे. त्यात शिल्पा शेट्टीता जुहूत असलेल्या बंगला देखील आहे. तिचा पती राज कुंद्रा याच्यावर ED नं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
और पढो »
सर्वसामान्यांना परवडतील डाळीच्या किंमती! दरवाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला 'हा' निर्णयPulses Prices: डाळी हा सर्वांच्या घरातील खाण्याचा महत्वाचा भाग आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच याची गरज लागती. वाढती मागणी पाहता डाळीच्या किंमतीतही वाढ होताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसतो.
और पढो »
आताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडतीLoksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
और पढो »
Monsoon 2024 : बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरुणराजा सरासरीहून अधिक बरसणार.. IMDची माहितीIMD monsoon 2024 predictions : जीवाची काहिली करणाऱ्या उकाड्यात हळुवार फुंर घालतेय मान्सूनच्या पहिल्यावहिल्या अधिकृत अंदाजाची ही बातमी...
और पढो »
निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचाMadha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे.
और पढो »
Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
और पढो »