Maharashtra Weather: राज्यातील काही भागात थंडीचा जोर कमी झाला आहे. तर ढगाळ वातावरणामुळं तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे.
राज्यातील काही भागातील गारठा कमी झाला आहे. तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं ऐन थंडीत पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान विभाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळं या भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या हवामान बदलांमुळं महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. दक्षिण केरळजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने समुद्रसपाटीपासून 3.1 किमी उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळं याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानवर दिसून येत आहे. या स्थितीमुळं चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी कमी -जास्त होत आहे. त्याचा परिणाम राज्यातील थंडीवर होत आहे.उत्तर भारतात १०० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. त्यामुळे थंडीमध्ये चढ-उतार होत असून, काही भागात दाट धुके कायम आहे. राज्यातील किमान तापमानातही काही अंशी घट- वाढ होत आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ होऊन वातावरणातील गारवा काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईत दोन दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांताक्रुझचा पारा पुढील आठवडाभर 35 अंशांच्या कमाल पातळीवर राहणार आहे, तर किमान तापमान 20 अंशांच्या पुढे नोंद होणार आहे.
Maharashtra Weather Update Maharashtra Weather Alert Weather Alert Today Mumbai Mumbai Weather Today आजचे हवामान आजचे हवामान कसे असेल Weather Today At My Location
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रमध्ये थंडीचा कडाका वाढणारमहाराष्ट्रमध्ये पुढील तीन दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
और पढो »
छगन भुजबळांचा एक निर्णय महाराष्ट्राचं राजकारण बदलणार?छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकवंलं खरं, पण आता पुढं काय करायचं या अडचणीत सापडले आहेत.
और पढो »
महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा कडाका; गारठा वाढण्याची शक्यतामहाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा दबदबा येऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडीच्या लाटे आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांच्या घटनेमुळे या परिस्थिती निर्माण झाली आहे.
और पढो »
महाराष्ट्रात बदलती हवामान परिस्थिती, गारपीटचा धोका आणि 30-40 किमी वेगाने वारेमहाराष्ट्रात हवामान परिस्थितीतील बदल. उत्तरेकडून येणाऱ्या थंडीचा कडाका कमी झाला असल्याने, राज्यात तापमानात वाढ झाली आहे. परंतु, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेकडे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि गारपीटचा धोका वाढला आहे.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव?Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडी जाणून घेऊया एका क्लिकवर
और पढो »
VIDEO: आजींच्या विनंतीला मान देऊन राहुल गांधी पोहोचले, पण घराची चावीच सापडेना; त्यांच्यासमोरच वाद 'मला काय माहिती...'Rahul Gandhi Viral Video: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच दिल्लीमधील एका केवेंटर्स स्टोअरचा दौरा केला. यादरम्यान एका आजीने त्यांना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं, जे राहुल गांधींनीही स्विकारलं.
और पढो »