प्रेमविवाह केल्याचा राग, कुटुंबीयांनीच महिलेचे अपहरण करुन केली हत्या अन्...

Crime News In Marathi समाचार

प्रेमविवाह केल्याचा राग, कुटुंबीयांनीच महिलेचे अपहरण करुन केली हत्या अन्...
Crime News Todayआजच्या ताज्या बातम्याआजच्या लाइव्ह बातम्या
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Crime News In Marathi: राजस्थानात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राजस्थानात एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीने प्रेम विवाह केला म्हणून कुटुंबीयांनी तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. राजस्थानच्या झलवार येथे ही घटना घडली असून 24 वर्षांच्या तरुणीला तिच्याच कुटुंबीयांनी संपवले आहे. ऑनर किलिंगच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे तिच्याच कुटुंबीयांनी अपहरण केले होते. तिच्या पतीसोबत असताना तिच्या कुटुंबीयांनी तिला त्याच्या डोळ्यांदेखत अपहरण केले. त्यानंतर तिची हत्या करुन तिच्यावर स्मशानात गुपचूप अत्यंसंस्कार करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून पीडित महिलेचा मृतदेह 80 टक्के जळाला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून सर्व आरोपी फरार आहेत. महिलेचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत असलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिमला कुशवाह असं या महिलेचे नाव असून एक वर्षांपूर्वी गावातील रवी भिल याच्यासोबत तिने प्रेमविवाह केला होता. या प्रेम विवाहामुळं त्यांचे कुटुंबीय नाराज होते. याच कारणामुळं महिला आणि तिचा पती वेगळे राहत होते. ते मुळगावापासून लांब असलेल्या गावात पाहत होते. गेल्या काही दिवसांपासून हे जोडपं मध्य प्रदेशातील एका ठिकाणी राहत होते. गुरुवारी दोघंही त्यांच्या मुळ गावी बँकेत आले होते. पैसे काढण्यासाठी ते बँकेत आले होते. याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली.

महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह जाळल्याप्रकरणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले आहे. यात महिलेचे अपहरण करताना कुटुंबीय दिसत आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Crime News Today आजच्या ताज्या बातम्या आजच्या लाइव्ह बातम्या Crime News Today Jhalawar Woman Killed Rajasthan Woman Killed For Love Marriage Rajasthan Woman Killed By Own Family Members

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडा'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडाDombivali Murder Mystery: डोंबिवलीमध्ये या 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी संक्षय आल्याने गुन्हा दाखल करुन घेतला आणि तपास सुरु केला.
और पढो »

दोन नद्यांच्या संगामामुळे दोन भागात विभागलेले महाराष्ट्रातील अनोखे गाव; पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारे निसर्गसौंदर्यदोन नद्यांच्या संगामामुळे दोन भागात विभागलेले महाराष्ट्रातील अनोखे गाव; पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारे निसर्गसौंदर्यSatara : दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगम माहुली परिसराचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करुन टाकते.
और पढो »

बर्थ-डे पार्टीत दारू कमी दिली, चिडलेल्या तरुणाने मित्राला चौथ्या मजल्यावरुन फेकले अन्...बर्थ-डे पार्टीत दारू कमी दिली, चिडलेल्या तरुणाने मित्राला चौथ्या मजल्यावरुन फेकले अन्...Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राची हत्या केली आहे.
और पढो »

वसईत दिवसाढवळ्या भयंकर हत्याकांड; भररस्त्यात लोखंडी पाना डोक्यात घालून प्रेयसीची हत्यावसईत दिवसाढवळ्या भयंकर हत्याकांड; भररस्त्यात लोखंडी पाना डोक्यात घालून प्रेयसीची हत्याVasai Murder News: वसईत दिवसाढवळ्या एक हत्याकांड घडले आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आहे.
और पढो »

तर तिचा जीव वाचला असता, मृत तरुणीने रोहितविरोधात दाखल केली होती तक्रार, पण पोलिसांनी...तर तिचा जीव वाचला असता, मृत तरुणीने रोहितविरोधात दाखल केली होती तक्रार, पण पोलिसांनी...Vasai Murder Case: प्रियकराने प्रेयसीची अमानुषपणे हत्या केली आहे. या घटनेने वसई हादरली आहे.
और पढो »

आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्यआधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्यChandrapur News : विदर्भातील एका शिक्षकाला ते भारतीय नसल्याचे निवृत्तीनंतर समजले आहे. त्यानी भारतात नोकरी केली आणि जमीनही खरेदी केली तरीही ते भारतीय नाहीत.
और पढो »



Render Time: 2025-02-21 06:23:25