Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे.
गणेश नाईक भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. बेलापूर , ऐरोली मतदारसंघावर गणेश नाईकांचा दावा असून, जर या दोन्ही ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजत आहे.
संदीप नाईक हे दोन टर्मचे आमदार आहेत, विकासात्मक चेहरा आहेत. अभ्यासू आहेत. त्यांनी केलेला जनसामान्यांमधील संवाद आणि पक्षातील योगदान पाहता नक्कीच भाजपाने त्यांना उमेदवारी दिली पाहिजे असं भाजपा पदाधिकारी रवींद्र इथापे म्हणाले आहेत. संदीप नाईक यांना डावलण्यात येत आहे असं वातावरण दिसत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना त्यांना कोणत्याही माध्यमातून बेलापूरची उमेदवारी घ्यायला लावायची आणि निवडून आणायचं हा चंग बांधला आहे असं भाजपा पदाधिकारी सूरज पाटील यांनी सांगितलं.
नवी मुंबईमधील राजकारणात गणेश नाईक यांची आतापर्यत एकहाती सत्ता आहे. ही सत्ता राखण्यासाठी त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला. पण भाजपाकडून दिलेल्या एकाही वचनाची पूर्तता न झाल्याने गणेश नाईक यांनी पुन्हा आपल्या स्वगृही परतावे असा सूर नुकत्याच पार पडलेल्या पदाधिकारी, नगरसेवकांच्या बेठकीत निघाला.लोकसभेला ठाण्यातून संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी झाली. परंतु तिथेदेखील भाजपाकडून निराशा पदरात पडली.
नवी मुंबईमधील दोन्ही जागा मिळाव्यात यासाठी नाईक पिता - पुत्र यांनी शरद पवार राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे मागणी केल्याचं समजत आहे. यामुळे नाईक पिता पुत्र पुन्हा स्वगृही परततात, की अपक्ष निवडणूक लढावी लागेल हे येत्या चार दिवसात समोर येईल. त्याचप्रमाणे बेलापूर मतदार संघातून शिंदे शिवसेना गटाचे उपनेते जय नाहटा निवडणूक लढवणार आहेत. यासाठी त्यांनी राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती.
Ganesh Naik BJP Uddhav Thackeray Shivsena NCP
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागीMaharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.
और पढो »
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा 'हा' मोठा नेता 'तुतारी' हाती घेणार?Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
और पढो »
मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंMumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिताMaharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.
और पढो »
खवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेRaigad Sea News: खवय्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे.
और पढो »
सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
और पढो »