Kolhapur Rain Alert: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. दोन्ही जिल्ह्यांना पुराचा धोका आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं पुराचे पाणी आता रस्त्यावर येऊ लागले आहे. कोल्हापूरात नदीचे पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसंच, सांगलीलाही पुराचा धोका वाढत चालला आहे. सांगली जिल्ह्यात धरणक्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळं धरणे तुडुंब भरली आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून या नदीच्या पण्यामुळे अनेक मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.
आज पहाटे 5 वाजता धरणाचा स्वयंचलित क्रमांक 1 चा दरवाजा उघडला. त्यामूळे नदी काठच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यास आहेत. जिल्ह्यांतील इतर नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. यातील अनेक नद्यांचे पाणी रस्त्यावर आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाड गावातील बाजारपेठेत ताम्रपणे नदीचे पाणी घुसले आहे. बाजारपेठेत सध्या दोन फूट पाणी आहे. इचलकरंजी शहरामधील सखल भागात पंचगंगा नदीचे पाणी घुसू शकते त्यामुळे सकल भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.एकूण 11 राज्यमार्ग मार्गावर पाणी आले आहे.
Heavy Rainfall In Kolhapur Maharashtra Weather Weather Today At My Location Maharashtra Weather Update Rain Weather Today At My Location Mumbai Weather Today कोल्हापूर पाऊस कोल्हापूर आजच्या बातम्या सांगली पाऊस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा कहर सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने तसे अलर्ट दिले आहेत.
और पढो »
रायगडमध्ये आभाळ फाटलं; तीन नद्यांनी ओलांडली धोका पातळी, शाळांना सुट्टी जाहीरRaigad Rain Update: रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.
और पढो »
पावसाचा कहर! चंद्रपूरमध्ये तलाव फुटले; गावात पाणी घुसलेविदर्भात पावसाने धुमाकूळ घातला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमुळे तलाव फुटले आहेत.
और पढो »
महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »
काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
और पढो »
कोकणातील घाटांचा राजा... कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाटकोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या गगनबावडा घाटाची थराराक सफर
और पढो »